अय्यो ! शेतकऱ्याचा पराक्रम बटाट्याच्या झाडावर पिकवली वांगी,टोमॅटो

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे एक म्हण आहे. जे पेराल तेच उगवेल. पण ही म्हण एका शेतकऱ्याने चक्क खोटी करून दाखवली आहे. हिमाचल प्रदेश मधल्या एका शेतकऱ्याने चक्क बटाट्याच्या रोपावर टोमॅटो आणि वांग्याचे पीक घेतले आहे. चला जाणून घेऊया या अनोख्या प्रयोगाबद्दल…

ही किमया करून दाखवली आहे हिमाचल प्रदेश मधल्या हमीरपूर जिल्ह्यात राहणाऱ्या परविंदर सिंग या व्यक्तीने. हमीरपूर जिल्ह्यातील लहाल्डी गावात ग्रामीण शास्त्रज्ञ परविंदर सिंग हे त्यांच्या विचारसरणीच्या जोरावर शेतीतील लोकांसाठी प्रेरणास्थान बनत आहेत.

एकाच रोपातून तीन भाज्या

शेतकरी परविंदर सिंग यांनी बटाट्यावर टोमॅटोची कलम केली आहे. वांग्याची कलमे बटाट्यावरच केली आहेत. त्यांची दीड महिन्याची मेहनत फळाला आली आहे. बटाट्याच्या रोपावर टोमॅटो दिसतायत. त्याचबरोबर बटाट्याच्या रोपावर वांगी पिकवण्याचा प्रयोगही यशस्वी झाला आहे. परविंदर सिंगचा हा प्रयोग पाहून सगळेच थक्क झाले आहेत. याआधीही काही वर्षांपूर्वी शेतकरी परविंदर सिंग यांनी एका वेलीतून तीन भाज्या उगवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता.

परविंदर सिंग यांनी सांगितले की, बटाट्यावर टोमॅटो आणि बटाट्यावर वांग्याचे कलम केले आहे, त्यामुळे एकाच रोपावर तीन पिके तयार होत आहेत. दीड महिन्यापूर्वी केलेल्या कलमासाठी आधी बटाटा तयार करून नंतर टोमॅटोची कलमे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याचे चांगले परिणाम समोर येत आहेत.

इतर शेतकरीही घेत आहेत धडे

परविंदर सिंग यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना कलम करण्याबाबतही शिकवले जात आहे. त्यांनी सांगितले की अशा प्रकारची रोपवाटिका तयार केली जाईल जेणेकरून छोट्या जागेत देखील उत्पादन घेतले जाऊ शकेल. अनेक पिके एकाच ठिकाणी तयार करण्यासाठी अशा चाचण्या घेतल्याचे त्यांनी सांगितले.

error: Content is protected !!