Farmers Foreign Tours : शेतकऱ्यांनो विदेशात जायचंय; असा काढा पासपोर्ट! वाचा सविस्तर…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या विदेश दौऱ्याच्या (Farmers Foreign Tours) निधीस नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. त्याबाबत सरकारकडून जीआर जारी करण्यात आला असून, शेतकऱ्यांना जवळच्या कृषी कार्यालयात संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील एकूण 120 शेतकरी व 6 अधिकारी हे विदेश दौऱ्यासाठी पाठवले जाणार आहे. मात्र यात सर्वात मोठा अडथळा हा शेतकऱ्यांना पासपोर्ट काढण्यासंदर्भात (Farmers Foreign Tours) असणार आहे. त्यामुळे नेमका हा पासपोर्ट काढायचा कसा? त्यासाठी कुठे अर्ज करायचा? याबाबत आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

‘राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे’ (Farmers Foreign Tours) या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून हा शेतकऱ्यांचा दौरा आयोजित केला जातो. यासाठी राज्य सरकारने एकूण अर्थसंकल्पीय निधीपैकी 1 कोटी 40 लाख रुपये इतक्या खर्चास चालू आठवड्यात मान्यता दिली आहे. तुम्हाला सरकारच्या मदतीने या दौऱ्यात सहभागी व्हायचे असेल तर तुमचा सातबारा, आठ-अ उतारा, वैद्यकीय प्रमाणपत्र आणि पासपोर्टची गरज असणार आहे. बाकी कागदपत्रे तुम्हाला सहजरित्या उपलब्ध होतील. मात्र शेतकऱ्यांना पासपोर्ट मिळवण्यासाठी अडचण येऊ शकते.

पासपोर्ट काढण्यासाठीचे कागदपत्रे (Farmers Foreign Tours Passport)

  • आधार कार्ड (इ साईन किंवा पीव्हीसी आधार कार्ड),
  • पॅनकार्ड
  • डायव्हिंग लायसन्स
  • जन्म पुरावा
  • याशिवाय शैक्षणिक प्रमाणपत्र असणे बंधनकारक असते.

पासपोर्टसाठी किती येतो खर्च ?

साधारणपणे शेतकऱ्यांना पासपोर्ट काढण्यासाठी अर्ज करताना 1 हजार 500 रुपये फी भरणा करावा लागतो. अर्ज केल्यानंतर तुम्हाला कागदपत्रांच्या पडताळणीसाठी बोलावले जाते. तुम्ही जर तात्काळ पासपोर्ट काढू इच्छित असाल तर तुम्हाला 1 हजार 500 रुपये ऐवजी साडे तीन हजार रुपयेपर्यंत खर्च येऊ शकतो.

कुठे कराल अर्ज?

पासपोर्ट काढण्यासाठी तुम्ही www.passportindia.gov.in या वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज करू शकतात. या वेबसाईटवर तुम्हाला स्वतःचा लॉग इन आयडी तयार करावा लागेल. अर्ज करताना यात तुम्हाला आधार नंबर, वोटिंग आयडी कार्ड क्रमांक, मोबाइल क्रमांक अशी सर्व माहिती भरावी लागते. आपण हा पासपोर्ट जिल्हा पासपोर्ट कार्यालयात जाऊन, अर्ज करूनही काढू शकता. शेतकऱ्यांनी शक्यतो कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने पासपोर्ट काढण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरून त्यांना योग्य वेळेत आणि परिणामकारकरित्या पासपोर्ट उपलब्ध होईल.

अधिक माहितीसाठी वाचा जीआर… (https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202401121545316801.pdf)

(पासपोर्ट काढताना कोणत्याही पातळीवर कोणीही अधिकच्या पैशांची मागणी केल्यास, शेतकऱ्यांनी पैसे देऊ नये. जवळच्या तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानेच पासपोर्ट काढण्याचा प्रयत्न करावा.)

error: Content is protected !!