Farmers Foreign Tours : राज्यातील शेतकरी विदेशात जाणार; आलाय सरकारचा जीआर…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रगत आणि विकसित देशांच्या शेतीबाबत (Farmers Foreign Tours) माहिती व्हावी. शेती क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान व्हावे यासाठी राज्य सरकारकडून वर्ष 2004-2005 पासून ‘राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे’ ही योजना राबविली जात आहे. त्यानुसार राज्य सरकारने यावर्षीच्या योजनेच्या एक कोटी 40 लाखांच्या खर्चाला मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांचा परदेशात शेतीबाबत (Farmers Foreign Tours) माहिती मिळवण्यास जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

120 शेतकऱ्यांची निवड (Farmers Foreign Tours Govt’s GR)

राज्य सरकारच्या ‘राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे’ या योजनेअंतर्गत राज्यातील एकूण 120 शेतकरी व 6 अधिकारी यांना परदेशात पाठवले जाणार आहे. त्यानुसार दौऱ्यासाठी राज्य सरकारने दोन कोटी या एकूण अर्थसंकल्पीय निधीपैकी 1 कोटी 40 लाख रुपये इतक्या खर्चास मान्यता दिली आहे. ही योजना राबविण्याची जबाबदारी राज्यातील नोडल अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली असून, याबाबत लवकरच सूचना काढण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहे. त्यामुळे आता कृषी विभागाकडून याबाबत लवकरच शेतकऱ्यांचा विदेश दौरा निश्चित केला जाण्याची शक्यता आहे.

योजनेत सहभागी होण्यासाठी कुठे कराल संपर्क?

तुम्हालाही या योजनेत सहभागी होऊन विदेशी शेतीबाबत माहिती जाणून घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही आपल्या जवळच्या तालुक्याच्या कृषी अधिकऱ्यांसोबत संपर्क साधू शकता. किंवा राज्य कृषी संचालक, विस्तार व प्रशिक्षण, पुणे येथेही संपर्क करू शकतात. या योजनेच्या माध्यमातून एकूण 120 शेतकरी आणि 6 अधिकारी यांचे एक पथक विदेशात पाठवले जाणार आहे.

सहभागासाठी कागदपत्रे व अटी

  • शेतकऱ्याचा सातबारा, आठ-अ उतारा.
  • परदेश दौऱ्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्याचे वय हे 21 ते 62 दरम्यान असावे.
  • संबंधित शेतकरी सरकारी कर्मचारी किंवा निमशासकीय संस्थांमध्ये नोकरी करणारा नसावा.
  • यापूर्वी संबंधीत शेतकऱ्याने सरकारच्या माध्यमातून परदेश दौरा केलेला नसावा.
  • वैद्यकीय प्रमाणपत्र.
  • संबंधित शेतकऱ्याकडे पासपोर्ट असावा.

अधिक माहितीसाठी वाचा जीआर… (https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202401121545316801.pdf)

error: Content is protected !!