Farmers Fraud : शेतकऱ्याने ऑनलाईन म्हैस मागवली; पैसे पाठवताच मालक, म्हैस गायब!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या ऑनलाईन व कॅशलेस आर्थिक व्यवहारांचे (Farmers Fraud) प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. देशभरातील नागरिक आपल्याला हव्या त्या वस्तू ऑनलाईन पद्धतीने अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि अन्य ई-कॉमर्स वेबसाइट्सवर मागवताना दिसतात. कृषी क्षेत्र आणि शेतकरीही त्यापासून दूर राहिलेले नाही. आज गाव खेड्यात ऑनलाईन व्यवहार वाढले आहेत. मात्र, त्याचबरोबर त्यात फसवणुकीच्या घटनाही वाढत आहेत. अशीच एक घटना उत्तरप्रदेशातील रायबरेली येथे समोर आली असून, एका दूध उत्पादक शेतकऱ्याने ऑनलाईन म्हैस मागवली. मात्र, ऑनलाईन पद्धतीने १० हजार रुपये मिळताच म्हशीचा मालक आणि म्हैस दोघेही गायब (Farmers Fraud) झाले आहेत.

युट्यूबवरून मिळाला मोबाईल नंबर (Farmers Fraud Ordered Buffalo Online)

उत्तरप्रदेशात सध्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने गंडा (Farmers Fraud ) घालण्याचे प्रमाण वाढले आहे. सुनील कुमार असे रायबरेली येथील दुग्धउत्पादक शेतकऱ्याचे नाव असून, या शेतकऱ्याने युट्यूबवर व्हिडीओ पाहून ऑनलाईन पद्धतीने म्हैस मागवली होती. युट्यूबवरील एका व्हिडीओमध्ये मिळालेल्या क्रमांकावर शेतकरी सुनील कुमार यांनी शुभम नावाच्या एका व्यक्तीला कॉल केला होता. यावेळी त्याला आपण ‘किसान भैया डेअरी फार्म’मधून बोलत असल्याचे शुभमने सांगितले होते. तसेच जयपूर येथील एका व्यापाऱ्याची जातिवंत म्हैस विक्रीस असल्याचे शुभमने शेतकरी सुनील कुमार यांनी सांगितले.

काय झाला होता दोघांमध्ये व्यवहार?

इतकेच नाही तर आपण व्यवहार करत असलेली म्हैस ही दररोज 18 लीटर दूध देते. तिची किंमत ५५ हजार रुपये असून, तुम्हाला ही म्हैस खरेदी करायची असल्यास गाडी (ट्रॅक) भाडे १० हजार रुपये द्यावे लागतील. तसेच म्हैस घरपोच पाठवली. म्हैस घरी पोहचताच तुम्हाला म्हशीची उर्वरित सर्व रक्कम ट्रक चालकाकडे द्यावे लागतील. असा व्यवहार शेतकरी सुनील कुमार आणि शुभम या दोघांमध्ये झाला होता. यासाठी सुनील कुमार यांनी शुभमला 10 हजार रुपये ऍडव्हान्स देखील पाठवला होता. मात्र ही दहा हजार रुपयांची रक्कम पाठवताच, कथित गंडा घालणारा शुभम आणि म्हैस दोघेही गायब झाल्याचे शेतकरी सुनील कुमार यांनी म्हटले आहे.

शेतकरी सुनील कुमार यांनी या संपूर्ण घटनेबाबत सायबर क्राईम पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच त्यांनी रायबरेली येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला भेट देऊन, पोलीस अधीक्षकांना या संपूर्ण घटनेत लक्ष घालण्याची विनंती केली आहे. सध्या पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत.

error: Content is protected !!