बैल बाजार बंदमुळे शेतकऱ्यांची तारांबळ; पेरणीला मिळेनात बैल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी । कोरडवाहु जमीन असलेल्या शेतकऱ्यांना वर्षभर शेतीत कामे नसतात. त्यामुळे केवळ पेरणीच्या वेळीच शेतकरी बैलजोडी घेतात. यावेळी पेरणी जवळ आल्याने शेतकरी बैलजोडीच्या शोधात आहेत. मात्र लाँकडाऊनमुळे बैलांचा बाजार बंद असल्याने अनेक शेतकरी बैलजोडी खरेदी करण्यासाठी गावोगावी जाणून, उन्हाची भटकंती करुन चढ्या दराने बैलजोडी खरेदी करताना दिसत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या कात्रीत अडकला आहे.

ऐन मृग नक्षत्राच्या तोंडावर शेती कामासाठी बैलजोडी नसल्याने ती खरेदी करण्यासाठी आता बहुतांश शेतकरी गावोगावी फिरुन चढ्या दराने खरेदी करत आहेत. पण, गावोगावी जाणेही अवघड झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पुढे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. अश्यातच अनेक गोष्टींनी शेतकऱ्यांना एकदाच घेरल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.

कमी जमीन, आर्थिक टंचाई आणि अपुरा पाऊस यामुळे शेतकरी दिवसेंदिवस आर्थिक संकटात सापडत आहे. आपल्याकडील पाळीव पशुधन विक्री करुन आपले आर्थिक व्यवहार भागविण्यासाठी त्यातून मिळण्याऱ्या पैशात आपल्या दैनंदिनी गरजा भागविण्यासाठी वापरत आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी हंगामी शेतीकामांना लागणारे बैलजोडी घेवून कामे करीत असतात.

 

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा

Leave a Comment

error: Content is protected !!