Farmers Lands : 17 शेतकरी कुटुंबांना मिळाल्या हक्काच्या जमिनी; सरकारच्या पाठपुराव्याला यश!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यासांठी आपली जमीन (Farmers Lands), कसतो ती काळी आई! काय असते. हे वेगळे सांगायला नको. आपल्या जमिनीवरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरु असतो. मात्र, एखाद्याने अशी जमीन अवघे २०० रुपये आणि किलोभर चिकनची पिशवी देऊन बळकावली असेल तर ती जमीन पुन्हा मिळणे जवळजवळ अशक्यप्राय असते. अशाच पद्धतीने सावकारी जाचात अडकलेल्या १७ कुटुंबांना राज्य सरकारने त्यांच्या हक्काच्या जमिनी परत मिळवून दिल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात या १७ शेतकरी कुटुंबांना त्यांच्या जमिनीचे ७/१२ वाटप (Farmers Lands) करण्यात आले आहे.

2019 साली समिती गठीत (Farmers Lands 17 Families Received)

राज्यातील प्रामुख्याने ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात सावकारांनी जमिनी बळकावण्याचे प्रकार अधिक घडतात. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना अवघे २०० रुपये, आणि आठवड्यात एकदा चिकन द्यायचे आणि जमिनी सावकारी पाशात अडकवायच्या. असा प्रकार घडतो. त्यामुळे एकदा सावकाराच्या ताब्यात गेल्यानंतर अशा शेतकऱ्यांना रोजंदारी करून कुटुंब चालवायचे की? जमीन परत कशी मिळवायची? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण होतात. मात्र, राज्याचे उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ साली याबाबत राज्य सरकारच्या वतीने एक समिती गठीत केली होती. या समितीच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील या १७ शेतकरी कुटुंबांना त्यांच्या जमिनी परत मिळवून देण्यात आल्या आहे.

शेतकऱ्यांना गुलामीतून मुक्त करणार

देवेंद्र फडणवीस यांनी या शेतकऱ्यांना जमिनींचे (Farmers Lands) सातबारा वाटप करताना म्हटले आहे की, सावकारांनी बळकावलेल्या जमिनी शेतकऱ्यांना परत मिळवून देणे. हा या शेतकऱ्यांना गुलामीतून मुक्त करण्याचा कार्यक्रम मागील काही वर्षांपासून राज्य सरकारने हाती घेतला होता. भविष्यात कोणीही शेतकऱ्यांच्या हक्काच्या जमिनी हडप करू शकणार नाही, अशी व्यवस्था उभारली जाईल. इतकेच नाही तर सध्या ज्या १७ शेतकऱ्यांना जमिनी परत मिळाल्या असतील अशा शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा ताबा मिळवून देणे, सरकरी खर्चाने त्यांच्या जागेवर, संबधित शेतकऱ्यांच्या मालकी पाट्या लावून देणे. तसेच योग्य सीमांकन आखून दिले जाणार आहे. याशिवाय या शेतकऱ्यांना कोणी धमकावले का? याबाबत त्यांच्याकडे वारंवार पोलीस प्रशासनाने भेटी द्याव्यात. असे आदेशही फडणवीस यांनी यावेळी संबंधीत विभागातील अधिकाऱ्यांना दिले आहेत.

‘ही’ आहेत शेतकऱ्यांची नावे

शेतकऱ्यांना जमिनी परत मिळालेल्यांमध्ये रवी हावरे, सुभाष धोडी, दशरथ खाले, बेबी धाडगे, सखू बाबर, संतोष बाबर, मालती जाधव, काळूराम वाघे, भीमाबाई वाघे, विमल तुंबडे, शिमगी वाघे, वसंत पागी, गोपाळ वाघ, चंदर खाले, यमुना गावित, जान्या धोडी, इंदू वाघे या 17 शेतकऱ्यांचा समावेश असून, त्यांना त्यांच्या नावाने कोणतेही कर्ज किंवा बोजा नसणारे जमिनीचे सातबारा देण्यात आले आहे. हे सर्व भिवंडी तालुक्यातील पडघा येथील शेतकरी आहेत.

error: Content is protected !!