Farmers Literature Conference : शेतकऱ्यांनो… मागत बसण्यापेक्षा, कोणते सरकार आणायचे ते ठरवा – पाटेकर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : अवघ्या जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या दुःखाकडे (Farmers Literature Conference) सध्या दुर्लक्ष होतंय. सरकार देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना गांभीर्याने घेत नाहीये. दिवसेंदिवस अनेक गोष्टींची भाववाढ होत असताना, शेतमालाचे दर मात्र वाढत नाहीये. ज्यामुळे शेतकरी आणखीनच दुःखात लोटला जात आहे. परिणामी, आता दुःखाच्या खाईत लोटलेल्या शेतकऱ्यांनी सरकारकडे काही गोष्टींची मागणी करत बसण्यापेक्षा, कोणते सरकार आणायचे? हे ठरवले पाहिजे. असे जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी म्हटले आहे. ते नाशिक जिल्ह्यातील मोहाडी येथे आयोजित 11 व्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाच्या (Farmers Literature Conference) उदघाटनप्रसंगी बोलत होते.

‘शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येतील’ (Farmers Literature Conference In Nashik)

यावेळी नाना पाटेकर यांनी साहित्यिकांचे देखील कान टोचले आहे. “शेतकऱ्यांच्या दुःखावर केवळ फुंकर मारणारे साहित्य (Farmers Literature Conference) लिहून चालणार नाही. तर त्यामध्ये क्रोधाची भावना, आक्रमकता असणे देखील तितकेच गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या दुःखाला वाचा फोडणारे साहित्य असावे.” असे आवाहन त्यांनी उपस्थित साहित्यिकांना केले आहे. तर “शेतकऱ्यांनी जगण्या-मरण्याच्या विवंचणेत न पडता, खंबीरपणे केवळ जगावं. सुगीचे दिवस नक्कीच येतील. त्यासाठी धीराने प्रयत्न करावेत. आपण सगळे त्यासाठी प्रयत्नशील आहोत.” असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

शरद जोशींच्या आठवणींना उजाळा

दरम्यान, यंदाच्या 11 व्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक भानू काळे, शेतकरी संघटनेचे नेते रामचंद्र पाटील, जेष्ठ साहित्यिक पुष्पराज गावंडे, मविप्र शिक्षण संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, ‘सह्याद्री फार्म्स’ या शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे, अखिल भारतीय शेतकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष गंगाधर मुटे, संमेलनाचे संयोजक ॲड. सतीश बोरुळकर हे देखील यावेळी उपस्थित होते. यावेळी विलास शिंदे यांनी शेतकरी नेते शरद जोशी यांच्या आठवणींना उजाळा दिला. तर साहित्य म्हणजे केवळ लिखाण नसते. तर शेतकरी साहित्याकडे देखील वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज असल्याचे संमेलनाचे अध्यक्ष भानु काळे यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!