Farmers Literature Conference : नाशिकमध्ये होणार 11 वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्या (Farmers Literature Conference) वाढतच आहेत. त्यास शेतमालाला न मिळणारा योग्य दर याशिवाय दुष्काळ, अतिवृष्टी, यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे सततची नापिकी, तर कधी पिकांवर होणारे रोंगाचे प्रादुर्भाव अशा अनेक समस्या कारणीभूत आहेत. याबाबत सरकारची देखील “रोज मरे, त्याला रडे” अशी मानसिकता झाली आहे. मात्र, मराठी साहित्यातून लेखणीद्वारे शेतीची दुर्दशा थांबवून, शेतकर्‍याच्या आयुष्यात सुखाचे व सन्मानाचे दिवस खेचून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर ४ व ५ मार्च २०२४ रोजी नाशिक येथे ११ व्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे (Farmers Literature Conference) आयोजन करण्यात आले आहे.

दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे सह्याद्री फार्म या शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रांगणात या संमेलनाचे (Farmers Literature Conference) आयोजन केले जाणार आहे. या ११ व्या साहित्य संमेलनाचे उदघाटन ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते होणार असून, संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक भानू काळे भूषविणार आहे. अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य चळवळीचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर मुटे हे या संमेलनाचे कार्याध्यक्ष तर सह्याद्री फामर्सचे अध्यक्ष विलास शिंदे हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष असणार आहे. या संमेलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या जाणार असल्याने, ते शेतकऱ्यांच्या मेहनतीला दिशा देणारे ठरणार असल्याचे आयोजकांकडून सांगितले जात आहे.

कशी असेल रूपरेषा? (Farmers Literature Conference)

४ मार्च २०२४, वार – सोमवार

  • सकाळी १० ते दुपारी १ वाजपर्यंत – उदघाटन सत्र
  • दुपारी २ ते ३.३० वाजेपर्यंत – ‘शेतीवरील सुलतानी संकट आणि साहित्यिकांचा दृष्टिकोण’ या विषयावर वक्ते मार्गदर्शन करतील. यात ज्ञानदेव राऊत, विकास पांढरे, मधुसूदन हरणे, डॉ. सुरेश मोहितकर यांचा वक्ते म्ह्णून समावेश असणार आहे.
  • त्यांनतर शेतकरी कवी संमेलन होईल.
  • सायंकाळी पाच वाजता – एका नामांकित कृषी क्षेत्रातील वृत्त समूहाच्या संपादकाची मुलाखत होईल.
  • सायंकाळी ७ ते ९ वाजता – सांस्कृतिक कार्यक्रम.

५ मार्च २०२४, वार – मंगळवार

  • शेतकरी कवी संमेलन
  • सकाळी १०.३० वाजता – सह्याद्री फार्मचे विलास शिंदे यांची मुलाखत.
  • ‘भारताकडून इंडियाकडे’ या विषयावर चर्चासत्र.
  • शेतकरी गझल मुशायरा व लेखन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण.
error: Content is protected !!