Farmers Loan : दीड लाखापर्यंतच्या शेती कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ; मुख्यमंत्र्यांची घोषणा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांच्या एक लाख 60 हजार रुपयांपर्यंतच्या शेती कर्जासाठीचे (Farmers Loan) मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे. शुक्रवारी (ता.15) बीड जिल्ह्यातील किसान क्रेडीट कार्डच्या डिजीटल प्रकल्प जनसमर्थचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीड जिल्ह्यातील 22 शेतकऱ्यांच्या खात्यात किसान क्रेडीट कार्डच्या माध्यमातून थेट रक्कम एका क्लिकद्वारे जमा करण्यात आली. सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी (Farmers Loan) उभे राहणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले आहे.

शेतकऱ्यांना 45 हजार कोटींची मदत (Farmers Loan Stamp Duty Upto 1.5 Lakh)

राज्यातील सरकार सर्वसामान्यांचे, शेतकऱ्यांचे आहे. शेतकऱ्यांना अतिवृष्टी, गारपीट अशा नैसर्गिक संकटात सरकारने भरभरून मदत केली. आपण शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून सर्व योजनांचे नियोजन करत आहे. शेतकऱ्यांना गेल्या दीड वर्षात 45 हजार कोटींचे (Farmers Loan) मदत राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. सिंचनांचे 120 प्रकल्प मार्गी लावण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील 15 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल. शेती, माती आणि शेतकरी यांच्याशी आपली नाळ जोडलेली आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले आहे. या कार्यक्रमास राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी व बीड जिल्हा प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.

4 लाख 75 हजार शेतकऱ्यांची नोंदणी

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी म्हटले आहे की, “किसान क्रेडीट कार्डच्या डिजीटायझेशनच्या या जनसमर्थ प्रकल्पासाठी देशातील दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये राज्यातील बीड जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील महसूल, कृषी अशा विविध विभागांनी एकत्र येऊन गेल्या काही दिवसांत 4 लाख 75 हजार शेतकऱ्यांची नोंदणी करून त्यांचे फॉर्म्सचे आयडी तयार केले आहेत. याकरिता दोन ॲपचीही निर्मिती करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्याला कागदपत्र विरहीत आणि घरबसल्या अल्पमुदतीच्या कर्जासाठी अर्ज करता येतो. याशिवाय या आयडीमुळे त्यांना सरकारच्या अन्य योजनांसाठीही अर्ज करणे आणि लाभ घेणे सुलभ होणार आहे.”

error: Content is protected !!