Farmers Loan : शेतकऱ्यांना मिळतंय 4 टक्के व्याज दराने 3 लाखांपर्यंत कर्ज; वाचा.. संपूर्ण प्रक्रिया!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना शेती करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा बँका त्यांना कर्ज (Farmers Loan) उपलब्ध करून देण्यास लवकर तयार होत नाही. हीच बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहे. यामध्ये शेतकऱ्यांना शेतीसाठी सहजपणे कर्ज उपलब्ध व्हावे. यासाठी केंद्र सरकारकडून ‘किसान क्रेडिट कार्ड योजना’ राबवली जात आहे. विशेष म्हणजे या योजनेद्वारे कर्ज मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना कोणतेही शुल्क लागत नाही. त्यामुळे आता शेतीसाठी सुलभतेने कर्ज (Farmers Loan) कसे मिळवायचे? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

किती मिळते कर्ज? (Farmers Loan Up To 3 Lakhs)

शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्ड काढल्यास त्यांना शेतीसाठी अगदी सहजपणे 3 लाखांपर्यंत कर्ज (Farmers Loan) मिळते. हे कर्ज प्रामुख्याने सर्व बँकांकडून 7 टक्के इतक्या दराने उपलब्ध करून दिले जाते. यामध्ये किसान क्रेडिट कार्डमुळे शेतकऱ्यांना सरकारकडून व्याजात 2 टक्के सूट दिली जाते. आणि कर्जदार शेतकरी नियमितपणे आपले व्याज भरत असेल तर सरकारकडून अशा शेतकऱ्यांना एकूण व्याज दरात आणखी 3 टक्के सूट दिली जाते. अर्थात किसान क्रेडिट कार्डद्वारे कर्ज काढल्यास शेतकऱ्यांना केवळ 4 टक्के व्याज दराने कर्ज मिळते.

कुठे काढाल किसान क्रेडिट कार्ड?

  • तुमच्या जवळच्या कोणत्याही बँक शाखेत तुम्ही किसान क्रेडिट कार्ड मिळवू शकतात.
  • यासाठी तुम्हाला संबंधित बँक अधिकाऱ्यांकडे या कार्डसाठी विचारणा करावी लागेल.
  • त्यानंतर बँक अधिकाऱ्यांकडून किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज घेऊन तो भरून द्या.
  • हा अर्ज जमा करताना तुम्हाला काही कागदपत्रे जोडावी लागणार आहे.
  • ही संपूर्ण प्रक्रिया तुम्ही संबंधित बँकेच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन देखील करू शकतात.

कोणती कागदपत्रे लागतात?

  • बँकेकडून मिळालेला केसीसीचा अर्ज.
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • आधारकार्ड
  • पॅनकार्ड
  • जमिनीचा ७/१२ , ८ अ

किसान क्रेडिट कार्ड मिळाल्यानंतर तुम्ही संबंधित बँकेत 4 टक्के व्याज दराने 3 लाखांपर्यंत कर्ज (Farmers Loan) मिळवण्यास पात्र असतात. विशेष म्हणजे या कार्डद्वारे 3 लाखापर्यंत कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला कोणतीही फी लागत नाही. या कार्डद्वारे कर्ज घेण्याची अधिकतम मर्यादा ही 5 वर्ष इतकी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या अडीअडचणीच्या काळात ‘किसान क्रेडिट कार्ड’द्वारे आपल्या जवळच्या बँकेत शाखेत जाऊन अगदी सहज कर्ज मिळवू शकतात.

error: Content is protected !!