पीक विम्यासाठी माजलगावातील शेतकऱ्यांनी अडवला पालकमंत्री सावेंचा ताफा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. ऐन दीपावली तोंडावर असताना शेतकऱ्यांचे पीक वाया गेल्यामुळे सण साजरा करायला पैसे नाहीत अशी अवस्था आहे. सरकार मदत करेल अशी आशा आहे मात्र अद्यापही पंचनामे देखील झाले नाहीत. अशात बीडचे पालकमंत्री अतुल सावे हे माजलगावचा दौऱ्यावर आले होते. त्यादरम्यान शेतकरी संघर्ष समितीनं त्यांचा ताफा अडवल्याची घटना घडली. अचानक ताफा अडवल्यानं शेतकरी आणि पोलिसांमध्ये थोडा काळ तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.

शेतकरी संघर्ष समितीने अडवला ताफा

परतीच्या पावसानं बीड जिल्ह्यातील पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. पंचनामे तर सोडा मात्र पीक विम्याची अग्रीम रक्कम देखील मिळाली नसल्यानं शेतकरी हतबल झाले आहेत. पालकमंत्री अतुल सावे हे माजलगावचा दौऱ्यावर आले होते. त्यादरम्यान शेतकरी संघर्ष समितीने त्यांचा ताफा अडवल्याचा प्रकार घडला. अचानक ताफा अडवल्यानं शेतकरी आणि पोलिसांत थोडा काळ तणाव निर्माण झाला होता. ओल्या दुष्काळाची जिल्ह्यावर गडद छाया असतानाच पालकमंत्री अतुल सावे मात्र बीडचं पालकत्व स्वीकारल्यानंतर केवळ दुसऱ्यांदा बीड जिल्ह्यात आले आहेत. यावेळी शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

error: Content is protected !!