Farmers Pension Scheme : शेतकऱ्यांना मासिक 3000 रुपये पेन्शन; ‘या’ राज्य सरकारचा मोठा निर्णय!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारकडून देशातील 60 वर्षांवरील शेतकऱ्यांना प्रति महिना 3000 रुपये पेन्शन (Farmers Pension Scheme) देण्याची घोषणा करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश सरकारने नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये योगी आदित्यनाथ सरकारने शेतकऱ्यांना 3 हजार रुपये मासिक पेन्शन देण्याची घोषणा केली आहे. ज्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या योजनेचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांना नेमके काय करावे लागेल? याबाबतची माहिती उत्तर प्रदेशच्या कृषी विभागाकडून अर्थसंकल्पीय घोषणेनंतर (Farmers Pension Scheme) जारी करण्यात आली आहे.

‘या’ आहेत योजनेच्या अटी? (Farmers Pension Scheme In Uttar Pradesh)

उत्तरप्रदेश सरकारने म्हटले आहे की, राज्यातील दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या अल्प-भूधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेसाठी शेतकऱ्यांचे वय 18 ते 40 दरम्यान असावे. यात 18 वर्षांवरील शेतकऱ्यांना 55 रुपये रुपये विमा हप्ता आणि 40 वर्ष वय असलेल्या लाभार्थ्यांना 200 रुपये विमा हप्ता योजनेसाठी भरावा लागणार आहे. त्यानंतर योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना 60 वर्षानंतर 3000 हजार रुपये इतकी मासिक पेन्शन दिली जाईल. याशिवाय काही कारणाने एखाद्या पेंशन धारक शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास, संबंधित शेतकऱ्यांच्या पत्नीला 1500 रुपये मासिक पेन्शन दिली जाईल, अशी माहिती उत्तरप्रदेश कृषी विभागाकडून जारी करण्यात आली आहे.

शेतीसाठी तीन नवीन योजना

याशिवाय उत्तरप्रदेश सरकारने यावर्षीच्या अर्थसंकल्पात राज्यातील शेतकऱ्यांसाठी तीन नवीन योजनांची देखील घोषणा केली आहे. यामध्ये मुख्यमंत्री शेत सुरक्षा योजना (50 कोटी), राज्य कृषी विकास योजना (200 कोटी) आणि युपी एग्रीज योजना (200 कोटी) या तीन योजनांचा समावेश आहे. या तिन्ही नवीन योजनांसाठी उत्तरप्रदेश सरकारने आपल्या अर्थसंकल्पात एकत्रिपणे 460 कोटींची तरतुदी केली आहे. त्यामुळे आता या योजनांचा उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यानं मोठा लाभ होणार आहे.

error: Content is protected !!