Farmers Protest : शेतकरी आंदोलनातील मृत शेतकऱ्यांचा आकडा 10 वर; आणखी तिघांचा मृत्यू!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या 35 दिवसांपासून पंजाब आणि हरियाणातील शेतकरी दिल्लीच्या शंभू आणि खनौरी बॉर्डरवर आंदोलन (Farmers Protest) करत आहे. मात्र, आता गेल्या महिनाभरात या शेतकरी आंदोलनादरम्यान 10 शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. शेतकरी बिशन सिंह, बलकार सिंह आणि तहल सिंह असे नव्याने मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांची नावे आहे. या तीनही शेतकऱ्यांचा मृत्यू हा हृदयविकाराचा झटका आल्याने झाल्याचे समोर आले आहे. आज मृत शेतकऱ्यांचे शवविच्छेदन केले जाणार असल्याचे (Farmers Protest) सांगितले जात आहे.

हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू (Farmers Protest 10 Farmer Died)

13 फेब्रुवारी रोजी पंजाब व हरियाणातील शेतकऱ्यांनी हमीभाव कायदा आणि अन्य 13 मागण्यांसाठी आंदोलन सुरु केले आहे. आतापर्यंत शेतकरी आंदोलनात (Farmers Protest) 7 शेतकऱ्यांनी आपले प्राण गमावले आहे. अशातच आता आणखी शेतकऱ्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यातील 72 वर्षीय बिशन सिंह यांना श्वास घेण्यास अडचण येत असल्याने, राजपुरा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. ज्यात त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे. शेतकरी बिशन सिंह हे आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून आंदोलनात सक्रिय सहभागी होते.

आज होणार शवविच्छेदन

अन्य एक 80 वर्षीय शेतकरी बलकार सिंह यांनी राजपुरा रेलवे स्टेशनवर, घरी जाण्यासाठी ट्रेनचा वाट पाहताना आपले प्राण सोडले. त्यांना उपस्थित रेलवे कर्मचाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये तात्काळ भरती केले. मात्र, हृदयविकाराच्या झटक्याने दवाखान्यात जाण्याचा अगोदरच त्यांनी आपले प्राण गमावले होते. याबाबत राजपुराच्या हॉस्पिटल प्रशासनाने म्हटले आहे की, “बिशन सिंह आणि बलकार सिंह यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याच्या आधीच त्यांचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही शेतकऱ्यांचे आज शवविच्छेदन केले जाणार आहे.”

अन्य तिसरे 40 वर्षीय मृत शेतकरी तहल सिंह हे पंजाबच्या मनसा जिल्ह्यातील रहिवासी आहे. खनौरी बॉर्डरवर आंदोलनादरम्यान रविवारी (ता.17) रात्री उशिरा त्यांना हृदयविकाराचा झटका आला. या तिन्ही शेतकऱ्यांनी गेल्या महिनाभरापासून शेतकरी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. या मृत शेतकऱ्यांवर शेतीचे कर्ज असल्याचे आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

error: Content is protected !!