Farmers Protest : दिल्लीतील आंदोलनात 63 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू; वाचा नेमकं काय घडलं!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील तीन दिवसांपासून पंजाब व हरियाणा येथील शेतकरी (Farmers Protest) नवी दिल्लीच्या वेशीवर हमीभाव कायदा करावा. या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. आज शेतकरी आंदोलनाचा चौथा दिवस असून, अशातच आता आंदोलनादरम्यान एका 63 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला असलयाचे समोर आले आहे. हरियाणातील अंबाला येथे शंभू बॉर्डरवर हृदयविकाराचा झटका आल्याने, या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. उपस्थित अधिकाऱ्यांनी या शेतकऱ्याला वेळीच दवाखान्यात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर या शेतकऱ्याला (Farmers Protest) मृत घोषित केले.

हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू (Farmers Protest In New Delhi)

ज्ञान सिंह (वय ६३) असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते पंजाबमधील गुरदासपुर येथील रहिवासी आहेत. दोन दिवसांपासून ज्ञान सिंह हे नवी दिल्ली येथील शेतकरी आंदोलनात (Farmers Protest) सहभागी झाले होते. मात्र, आज सकाळी छातीत दुखत असल्याने त्यांनी आंदोलनादरम्यान उपस्थित अधिकाऱ्यांना याची कल्पना दिली होती. त्यानुसार संबधित अधिकऱ्यांना त्यांना पटियाला येथील दवाखान्यात दाखल केले. मात्र तपासणीदरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हृद्यविकाराचा झटका आल्याने या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. त्यामुळे आता शेतकरी आंदोलनातील पहिली मृत्यूची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

हरियाणा, पंजाबमध्ये कडकडीत बंद

दरम्यान, शेतकरी संघटना आणि केंद्र सरकार यांच्यातील तिसरे बैठक निष्फळ ठरली होती. ज्यामुळे आज शेतकरी आंदोलनाच्या चौथ्या दिवशी शेतकरी संघटनांकडून भारत बंदची हाक देण्यात आली आहे. संयुक्त किसान मोर्चा या संघटनेसह 37 शेतकरी संघटनांनी शेतकऱ्यांच्या विविध मागणीसाठी ही देशव्यापी बंदची हाक दिली आहे. ज्यास काँग्रेस पक्षाने देखील पाठिंबा जाहीर केला आहे. ज्यामुळे आज सकाळपासूनच हरियाणासह पंजाबमधील अमृतसर, फरीदकोट, रोहतक आणि अन्य सर्वच जिल्ह्यांमध्ये कडकडीत बंद पाळला जात असल्याचे पाहायला मिळाले. तर पंजाबसह उत्तरेकडील सर्वच राज्यांमध्ये देखील भारत बंदचा परिणाम दिसून आला असल्याचे सांगितले जात आहे.

उद्या बीजेपी नेत्यांच्या घरांना घेराव

उद्या शेतकरी आंदोलनाचा पाचवा दिवस असणार असून, शेतकरी अधिकच आक्रमक होत चालल्याचे पाहायला मिळत आहे. शनिवारी संयुक्त किसान मोर्चाकडून पंजाबमधील सर्व भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या नेत्यांच्या घराला घेराव घातला जाणार आहे. यामध्ये पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह, पंजाबचे बीजेपी अध्यक्ष सुनील जाखड़ आणि बीजेपी नेता केवल सिंह ढिल्लों यांच्या घरासमोर शेतकरी धरणे आंदोलन करणार असल्याचे सांगितले जात आहे.

error: Content is protected !!