Farmers Protest : शेतकरी संघटना 3 राज्यांमध्ये सभा घेणार; फुटीरतावादी वक्तव्याचा खरपूस समाचार!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : संयुक्त किसान मोर्चासह देशभरातील शेतकरी संघटनांकडून गेल्या महिनाभरापासून शेतकरी आंदोलन (Farmers Protest) सुरु करण्यात आले आहे. अशातच आज सर्व शेतकरी संघटनांच्या वतीने (ता.19) संयुक्त किसान मोर्चाचे शेतकरी नेते जगजीत सिंह डल्लेवाल यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी जगजीत सिंह डल्लेवाल यांनी 22 मार्च ते 31 मार्च या कालावधीमध्ये हरियाणा, उत्तरप्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये शेतकरी संघटनांकडून (Farmers Protest) सभा आयोजित केल्या जाणार असल्याचे म्हटले आहे. प्रामुख्याने आरएसएस या भाजपप्रणित संघटनेच्या विधानामुळे शेतकरी संघटनांनी हा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

आरएसएसच्या वक्तव्याचा समाचार (Farmers Protest In Delhi)

शेतकरी संघटना सरळ मार्गाने आंदोलन करत आहे. आरएसएसने शेतकऱ्यांना फुटीरतावादी म्हणणे हे चिंताजनक असून, देशातील अल्पसंख्याकांना संपवण्याचा हा डाव असल्याचेही शेतकरी संघटनांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी नेत्यांनी पत्रकार परिषदेत आरएसएसकडून दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना फुटीरतावादी म्हटल्याचा देखील यावेळी खरपूस समाचार घेतला आहे. दरम्यान, काही फुटीरतावादी लोक लोकसभा निवडणूक तोंडावर आल्याने, शेतकरी आंदोलनाच्या (Farmers Protest) माध्यमातून समाजात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. असे आरएसएसने म्हटले होते. शेतकरी नेते जगजीत सिंह डल्लेवाल यांनी आरएसएसच्या या व्यक्तव्याला धोकादायक असल्याचे म्हटले आहे. तसेच यामुळे आंदोलक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

अस्थिकलश यात्रेचे आयोजन

शेतकरी नेते जगजीत सिंह डल्लेवाल यांनी म्हटले आहे की, शुभकरण सिंह याचा 21 फेब्रुवारी रोजी शेतकरी आंदोलनादरम्यान मृत्यू झाला होता. त्यामुळे शेतकरी संघटनांनी शुभकरण सिंह याच्या अस्थिकलश यात्रेचे आयोजन केले असून, 22 मार्च ते 31 मार्चपर्यंत सर्व जिल्ह्यांमध्ये सभा भरवल्या जातील. यात प्रामुख्याने उत्तर प्रदेशात संभल, अलीगड आणि सहारनपुर या भागांमध्ये ही यात्रा जाणार आहे. याशिवाय क्रांतिवीर भगत सिंह, राजगुरु आणि सुखदेव यांचा 23 मार्च रोजी शहीद दिवस आहे. या दिवशी सर्व आंदोलस्थळांवर मृत शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहून हा दिवस शोक दिवस म्हणून साजरा केला जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!