Farmers Protest : लोकसभा निवडणुकीदरम्यान आंदोलन सुरूच राहणार; संघटनांचे संकल्पपत्र जारी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : 13 फेब्रुवारी 2024 रोजी सुरु झालेल्या शेतकरी आंदोलनाला (Farmers Protest) आज महिना उलटून गेला आहे. मात्र आता हे शेतकरी आंदोलन कधी थांबणार? किंवा त्यावर नेमका काय तोडगा निघणार? याचा सध्याच्या घडीला काहीही अंदाज लावला जाऊ शकत नाही. अशातच आता शेतकरी आंदोलन करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाकडून एक संकल्पपत्र जारी करण्यात आले आहे. 14 मार्च रोजी नवी दिल्ली येथील रामलीला मैदानावर पार पडलेल्या शेतकरी संघटनांच्या महापंचायतीनंतर हे संकल्पपत्र जारी करण्यात आले आहे. या संकल्पपत्रानुसार शेतकरी आंदोलन आणखी तीव्र करून, लोकसभा निवडणुकीदरम्यान देखील हे आंदोलन (Farmers Protest) सुरु ठेवण्याचा निर्धार शेतकरी संघटनांनी केला आहे.

जनआक्रोश निर्माण करण्याचे आवाहन (Farmers Protest In Delhi)

14 मार्च रोजी दिल्ली येथे झालेल्या शेतकरी संघटनांच्या महापंचायतीनंतर संयुक्त किसान मोर्चा या शेतकरी आंदोलनातील (Farmers Protest) आघाडीच्या संघटनेकडून हे संकल्पपत्र जारी करण्यात आले आहे. यात शेतकऱ्यांनी केंद्रातील मोदी सरकारविरोधात देशव्यापी जनआक्रोश निर्माण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय शेतकऱ्यांच्या सर्व पिकांना सी-2+50 टक्के हमीभाव लागू करण्यासह, शेतकरी कर्जमाफी योजना, विद्युत क्षेत्राचे खासगीकरणाचा विरोध या आणि अशा अनेक महत्वपूर्ण बाबींचा उल्लेख संकल्पपत्रात करण्यात आला आहे.

‘शेतकऱ्यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी’

याशिवाय शेतकऱ्यांच्या या संकल्पपत्रात तरुण शेतकरी शुभकरण सिंह याच्या मृत्यूप्रकरणी न्यायपूर्ण मार्गाने चौकशी व्हावी. भारतीय दंड संहितेच्या कलम 302 नुसार, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह, हरियाणाचे पूर्व मुख्‍यमंत्री मनोहर लाल खट्टर आणि अनिल विज यांच्या विरोधात एफआयआर दाखल करावी. अशी मागणी देखील या संकल्पपत्रात करण्यात आली आहे. याशिवाय संयुक्त किसान मोर्चाने शेतकऱ्यांचे आंदोलन एका मोठ्या जनआक्रोश आंदोलनात रूपांतरित करावे, असे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे. याशिवाय आगामी 23 मार्च रोजी भगतसिंह यांचा स्मृती दिवस देशभरातील गावागावांमध्ये ‘लोकशाही बचाव’ दिवस म्हणून साजरा करण्याचा संकल्प देखील करण्यात आला आहे.

error: Content is protected !!