Farmers Protest : शेतकरी आंदोलनाचा वणवा पसरणार; युपी, राजस्थानातही शेतकरी आक्रमक!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला पंजाब व हरियाणामधील (Farmers Protest) शेतकरी केंद्र सरकारविरोधात हमीभावाचा कायदा करण्यासाठी जिकरीने लढा देत आहे. आज आंदोलनाचा पाचवा दिवस असून, आता या आंदोलनाचा वणवा राजस्थान, उत्तरप्रदेश, आणि मध्यप्रदेश या शेजारील राज्यांमध्ये देखील पसरला आहे. या तीन राज्यांतील शेतकरी संघटनांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनात सक्रिय पाठिंबा देऊन, आंदोलन तीव्र करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता लवकरच शेतकरी आंदोलनाचा (Farmers Protest) वणवा आणखी भडकणार असल्याचे पाहायला मिळणार आहे.

युपीतील शेतकरीही आक्रमक (Farmers Protest In New Delhi)

उत्तर प्रदेशातील भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत यांनी 21 फेब्रुवारीपासून हमीभाव कायद्यासाठी युपीतील सर्व जिल्ह्यांसह देशभरात शेतकरी आंदोलन तीव्र करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी 21 फेब्रुवारी रोजी युपीतील मेरठहून दिल्लीतील गाजीपुर बॉर्डरपर्यंत शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

राजस्थानातही शेतकऱ्यांची एकजूट

राजस्थानमधील शेतकरी महापंचायतचे अध्यक्ष रामपाल जाट यांनीदेखील राजस्थानातील शेतकऱ्यांना एकजूट केले आहे. त्यांनी राजस्थानातील शेतकऱ्यांकडून 21 फेब्रुवारी रोजी जयपुर ते दिल्ली ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. तर मध्यप्रदेशातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शेतकरी युनियन शाखा असलेल्या भारतीय किसान संघाने देखील मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आंदोलनाची घोषणा केली आहे. त्यामुळे आता देशातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारला चोहोबाजूने घेरण्याची योजना बनवली असल्याचे पाहायला मिळत आहे.

सरकारविरोधात शेतकऱ्यांचा रोष

परिणामी आता ऐन लोकसभा निवडणुकीचा तोंडावर शेतकऱ्यांनी मोदी सरकारला घेरले असून, येत्या काही दिवसांमध्ये हा शेतकरी आंदोलनाचा वणवा आणखी काही राज्यांमध्ये पसरल्यास नवल वाटायला नको. कारण सध्या देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने अनेक भागात सरकारविरोधात शेतकऱ्यांचा रोष आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार नेमके या शेतकरी आंदोलनातून कसा मार्ग काढणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

error: Content is protected !!