Farmers Protest : अखेर शेतकऱ्यांनी रेल्वे वाहतूक रोखली; पहा… शेतकरी आंदोलनाचा व्हिडिओ!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : हमीभाव कायद्यासाठी पंजाब, हरियाणासह (Farmers Protest) उत्तरेकडील राज्यांमधील शेतकरी 13 फेब्रुवारीपासून आंदोलन करत आहे. आंदोलनात सहभागी सर्वच शेतकरी संघटनांनी आज 10 मार्च रोजी ‘रेल्वे वाहतूक’ रोखण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आज ठीक दुपारी बारा वाजता सरकार विरोधात घोषणाबाजी करत अमृतसर-दिल्ली रेल्वे मार्ग शेतकऱ्यांनी राखून धरला. इतकेच नाही तर चंडीगड, अमृतसर आणि देवीदासपुरा सहित पंजाब व हरियाणा राज्यासह अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांनी रेल्वे मार्गांवर (Farmers Protest ) ठाण मांडले असल्याचे वृत्त आहे. रेल्वे वाहतूक रोखण्याचा आधीच इशारा देण्यात आल्याने प्रशासनाकडून त्या ठिकाणी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

रेल्वे ट्रकवर बसलेत शेतकरी (Farmers Protest Rail Traffic Stopped)

पंजाबमधील देवीदासपुरा या ठिकाणी अमृतसर-दिल्ली रेल्वे मार्गावर शेतकरी संघटनांचे प्रमुख नेते उपस्थित आहेत. शेतकरी नेते सरवन सिंह पंढेर यांनी म्हटले आहे की, आम्ही देवीदासपुरासह पंजाब राज्यातील सर्व 22 जिल्ह्यांच्या रेल्वे मार्गांवर आंदोलन केले आहे. दुपारी 12 ते 4 या काळात सर्व शेतकरी केंद्र सरकाराविरोधात हे आंदोलन (Farmers Protest) करणार आहे. तसेच या आंदोलनाला हरियाणा राज्यातही साथ मिळत असून, सर्वच देशभरात शेतकऱ्यांना रेल्वे वाहतूक रोखून आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी रेल्वे वाहतूक रोखल्याने फिरोजपुर, अमृतसर, रूपनगर, गुरदासपुर यासह अनेक भागांमध्ये रेल्वे सेवा पूर्णपणे प्रभावित झाल्याचे सांगितले जात आहे.

संघर्ष सुरूच राहणार

शेतकरी नेते सरवन सिंह पंढेर यांनी म्हटले आहे की, जोपर्यंत हमीभाव कायद्याची मागणी पूर्ण होत नाही. तोपर्यंत सरकारविरोधातील हा संघर्ष सुरूच राहणार आहे. 13 फेब्रुवारीला आंदोलन सुरु झाले तेव्हाच जाणवले होते. केंद्र सरकार इतक्या सहजासहजी शेतकऱ्यांची ही मागणी पूर्ण करणार नाही. त्यामुळे सर्व शेतकरी संघटना शेतकऱ्यांना घेऊन, आंदोलन आणखी तीव्र करण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, आजच्या शेतकऱ्यांच्या रेल्वे वाहतूक रोखण्याच्या पार्श्वभूमीवर, कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ नये. म्हणून मोठ्या संख्येने पोलीस फौजफाटा तैनात असल्याचे एका पोलीस दलातील अधिकाऱ्याने म्हटले आहे.

error: Content is protected !!