Farmers Protest : 7 एप्रिलला शेतकऱ्यांकडून देशभरात भव्य मिरवणूक; रेलवे वाहतूकही राखणार!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : हमीभाव कायद्यासह विविध मागण्यांसाठी देशातील शेतकरी 13 फेब्रुवारीपासून आंदोलन (Farmers Protest) करत आहेत. शंभू बॉर्डर, खनौरी, डबवली, रतनपुरा बॉर्डर या ठिकाणी शेतकरी हे आंदोलन करत आहेत. अशातच आता 7 एप्रिल रोजी देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात शेतकरी संघटनांकडून मिरवणूक काढली जाणार आहे. तसेच देशात ठिकठिकाणी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या पुतळ्याचे दहन करण्यात येणार आहे. आज (ता.२) संयुक्त किसान मोर्चासह प्रमुख शेतकरी संघटनांनी (Farmers Protest) चंदीगड येथे पत्रकार परिषदेत ही माहिती जाहीर केली आहे.

श्रद्धांजली सभांचे आयोजन (Farmers Protest In Delhi)

याशिवाय 9 एप्रिल रोजी शंभू सीमेवर रेल्वे वाहतूक रोखण्यात येणार (Farmers Protest) असल्याची घोषणा करण्यात आली आहे. इतकेच नाही तर केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू या दक्षिणेकडील राज्यांमध्ये देखील 3 ते 11 एप्रिल या कालावधीत तरुण शेतकरी शुभकरन सिंह याच्या श्रद्धांजली सभांचे आयोजन करण्यात केले जाणार आहे. असे शेतकरी संघटनांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने अलीकडेच काही बाजार समित्या रद्द करण्याचे आदेश जारी केले आहेत. तसेच काही बाजार समित्यांमध्ये गव्हाची साठवणूक केली जात आहे. हे देशभरात पुन्हा 3 कृषी कायदे करण्याचे द्योतक असल्याचेही शेतकरी संघटनांनी म्हटले आहे.

शेतकरी नेत्यांच्या सुटकेची मागणी

शेतकरी आंदोलनाच्या घोषणेआधी 10 फेब्रुवारीपासून हरियाणात शेकडो शेतकऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यातील 5 शेतकरी नेते अजूनही तुरुंगात आहेत. या शेतकरी नेत्यांची सुटका करण्यात यावी. अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे. तर शंभू बॉर्डर, खनौरी, डबवली, रतनपुरा बॉर्डर येथे शेतकरी धरणे आंदोलन करत असल्याचेही शेतकरी संघटनांनी यावेळी म्हटले आहे. शेतकरी आंदोलकांना त्रास देण्यासाठी सर्वच सीमा भागात वीज जाणीवपूर्वक खंडित केली जात असल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. असेही संघटनांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!