Farmers Protest : फ्रान्सनंतर भारतातही शेतकरी आक्रमक; 13 फेब्रुवारीला ट्रॅक्टरसह दिल्लीला धडक!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या भारतातच नाही जगभरात शेतकरी आक्रमक (Farmers Protest) भूमिका घेताना दिसत आहे. फ्रान्समध्ये सुरु झालेली शेतकरी आंदोलनाची धग आता युरोपातील आसपासच्या 8 देशांमध्ये पसरली आहे. त्या ठिकाणी शेतकरी सरकारविरोधात आक्रमक होत रस्त्यांवर शेणाचे, गवताचे ढीग घालत आहे. तर काही शेतकरी शेणाच्या पाण्याचे टँकरद्वारे फवारे उडवत आहेत. परिणामी, तेथील राजकीय नेत्यांना घराबाहेर पडणे देखील मुश्किल झाले आहे. अशातच आता भारतातही पंजाब व हरियाणा या राज्यांतील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारविरोधात आंदोलनाचे रणशिंग (Farmers Protest) फुंकले आहे. दोन्ही राज्यांतील अनेक शेतकरी संघटनांकडून 13 फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथे सरकारविरोधात फ्रान्समधील शेतकऱ्यांप्रमाणे ट्रॅक्टर रॅली काढली जाणार आहे.

मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष (Farmers Protest In India)

चार वर्षांपूर्वी केंद्र सरकारने भारतात तीन कृषी कायदे आणले होते. त्याविरोधात 2021 या संपूर्ण वर्षभर शेतकऱ्यांनी आपले आंदोलन (Farmers Protest) सुरु ठेवले होते. आंदोलनकर्त्यांपुढे नमते घेत सरकारला हे कायदे मागे घेण्याची नामुष्की ओढवली होती. त्यावेळी शेतकरी आंदोलन मागे घेताना, शेतकरी संघटनांनी केंद्र सरकारकडे काही मागणी ठेवल्या होत्या. या मागण्या अजूनही केंद्र सरकारकडून पूर्ण करण्यात आलेल्या नाही. याच पार्श्वभूमीवर पंजाब व हरियाणातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे अस्र उगारले आहे. हरियाणातील सोनिपत या ठिकाणी शेतकरी संघटनांनी नुकतेच एकत्र येत ट्रॅक्टर रॅलीबाबत सराव केला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची तयारी केली असून, केंद्र सरकारच्या अडचणीत वाढ होणार आहे.

काय आहे मागण्या?

  • शेतमालाला किमान आधारभूत किंमत (एमएसपी) देणारा कायदा करावा.
  • स्वामिनाथन आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करावी.
  • 2006 मध्ये एम.एस. स्वामीनाथन यांनी कृषी खर्च आणि किंमत आयोगाला उत्पादनाच्या आधारावर सरासरी खर्चापेक्षा किमान 50 टक्के अधिक एमएसपी निश्चित करण्याची सूचना केली होती.
  • शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी.
  • विजेचे खासगीकरण थांबवावे.
  • 60 वर्षांवरील शेतकऱ्यांना पेन्शन द्यावी.

दरम्यान, हरियाणातील शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे पत्र केंद्र सरकारला पाठवले असून, सरकारला याबाबत माहिती देण्यात आली आहे. आपल्या पत्रात शेतकरी संघटनांनी म्हटले आहे की, 13 फेब्रुवारी रोजी पंजाब आणि हरियाणातील शेतकरी पंजाबच्या लागून असलेल्या सीमावर्ती भागातून राजधानी दिल्लीच्या दिशेने आपली ट्रॅक्टर रॅली काढणार आहे. ही रॅली दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानापर्यंत जाणार आहे. सरकारने शेतकऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशाराही शेतकरी संघटनांनी सरकारला पत्राद्वारे दिला आहे.

error: Content is protected !!