Farmers Protest : शेतकऱ्यांची महापंचायत संपन्न; भगतसिंहांच्या शहीद दिनी कार्यक्रमाची तयारी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या 13 फेब्रुवारीपासून शेतकरी हमीभाव कायदयाच्या मागणीसह आपल्या अन्य मागण्यांसाठी दिल्ली येथे आंदोलन (Farmers Protest) करत आहे. अशातच आज संयुक्त किसान मोर्चाकडून नवी दिल्ली येथील रामलीला मैदानावर महापंचायतीचे आयोजन करण्यात आले होते. आज सकाळी 10 ते दुपारी अडीच वाजेपर्यंत चाललेल्या या महापंचायतीसाठी आलेले शेतकरी जवळपास 2000 बसमधून माघारी परतण्यासाठी निघाले आहे. त्यातच आता 23 मार्च 2024 रोजी क्रांतिवीर भगतसिंह यांच्या शहीद दिनी आंदोलक शेतकऱ्यांकडून (Farmers Protest) मोठा कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत सांगितले जात आहे. याशिवाय आपल्या मागण्यांसाठी शेवटपर्यंत संघर्ष करत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

30 हुन अधिक संघटनांची उपस्थिती (Farmers Protest In Delhi)

शेतकऱ्यांच्या महापंचायतीसाठी आज जवळपास 30 हुन अधिक शेतकरी संघटनांनी उपस्थिती लावली. आज नवी दिल्ली येथील (ता.14) रामलीला मैदानावर झालेल्या महापंचातीसाठी 5000 शेतकऱ्यांना एकत्र येण्यासाठी दिल्लीत येण्यासाठी अनुमती देण्यात आली होती. या महापंचायतीमध्ये शेतकरी नेते राकेश टिकैत, गुरनाम सिंह चढ़ूनीसह अन्य सर्वच शेतकरी नेत्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित करत, शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत बोलणी झाली. दुपारी अडीच वाजता महापंचायत संपल्यानंतर शेतकरी आंदोलनाबाबत पुढील योजना समोर आली आहे.

शहीद दिनी मोठ्या कार्यक्रमाची योजना

शेतकरी संघटनांनी आंदोलनाबाबत पुढील रणनीती उघड नाही केली. मात्र, उपलब्ध माहितीनुसार 23 मार्च रोजी भगतसिंह यांच्या शहीद मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. यासाठी गावागावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांना शेतकरी आंदोलनासोबत जोडले जाण्याचे आवाहन केले जाणार आहे. त्यामुळे 23 मार्च रोजी शेतकरी आंदोलनाची पुढील रणनीती समोर येऊ शकणार आहे. मात्र असे असले तरी शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी घोषणा केली आहे की, पुढील आंदोलन कुंडली-मानेसर-पलवल राष्ट्रीय महामार्गावर होणार आहे. मात्र याबाबत कोणतीही तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. 23 मार्च रोजी याबाबत पुढील रणनीती समोर येणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, 2000 बस करून शेतकरी या महापंचातीसाठी दिल्लीला आल्याचे सांगितले जात आहे.

error: Content is protected !!