Farmers Protest : शेतकऱ्यांची दिल्लीच्या दिशेने कूच; सरकारला पुन्हा घेरण्याची तयारी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : 13 फेब्रुवारी रोजी चलो दिल्लीचा नारा देत, सुरु झालेल्या शेतकरी आंदोलनाचा (Farmers Protest) आज 23 वा दिवस आहे. शेतकरी आंदोलनात आतापर्यंत 8 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये 5 आंदोलक शेतकरी तर 3 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ज्यामुळे गेले काही दिवस शेतकरी आंदोलन थंडावले होते. मात्र, आता पुन्हा हमीभाव कायदा या प्रमुख मागणीसाठी संयुक्त किसान मोर्चासह शेतकरी संघटनांच्या आंदोलनाच्या हाकेवर शेतकऱ्यांनी दिल्लीच्या दिशेने आपली वाटचाल सुरु केली आहे. शंभू आणि खनौरी सीमेवर आंदोलक शेतकरी (Farmers Protest) जमा होत असताना, पोलिस देखील कायदा व सुव्यवस्थेसाठी अलर्ट झाल्याचे सांगितले जात आहे.

पोलीस प्रशासन अलर्टवर (Farmers Protest Towards Delhi)

दोनच दिवसांपूर्वी शेतकरी संघटनांनी पुन्हा आंदोलनाची हाक देत, 10 मार्च रोजी रेल्वे वाहतूक रोखण्याचा इशारा दिला आहे. मात्र, दिल्ली पोलिसांनी सर्व सीमांवर पोलीस फौजफाटा वाढवला असून, राजधानी दिल्ली परिसरात शेतकऱ्यांना आंदोलन (Farmers Protest) करण्याची परवानगी दिली नसल्याचे दिल्ली पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय 10 मार्चला शेतकऱ्यांनी रेल्वे वाहतूक रोखण्याचा इशारा देण्यात आला असला तरी रेलवे पोलिसांना देखील अलर्टवर ठेवण्यात आले असल्याचे पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता शेतकरी संघटनांनी आंदोलनाची घोषणा दिली असली तरी पोलीस आणि आंदोलक यांच्यात पुन्हा संघर्ष होण्याची शक्यता पोलीस प्रशासनाच्या तयारीवरून दिसून येत आहे.

रामलीला मैदानावर महापंचायत

दरम्यान, शेतकरी संघटनांनी आजपासून आंदोलनाची हाक देत, 10 मार्च रोजी रेलवे वाहतूक रोखण्याचा तर 14 मार्च रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानावर शेतकरी संघटनांची महापंचायत भरवण्याची घोषणा केली आहे. या महापंचायतीला शेतकरी मजूर महापंचायत असे नाव देण्यात आले आहे. या महापंचायतीमध्ये देशभरातील शेतकरी ट्रॅक्टर-ट्रॉली ऐवजी बस, रेल्वे आणि अन्य वाहनांनी रामलीला मैदानावर जमणार आहे. याबाबत शेतकरी नेते अभिमन्यु कोहाड़ यांनी म्हटले आहे की, सरकारने शेतकऱ्यांना विना ट्रॅक्टर-ट्रॉलीचे येण्याचे आवाहन केले होते. ज्यामुळे आता शेतकरी बस, ट्रेन आणि अन्य वाहतूक साधनांनी एकत्र येत आंदोलन करणार आहे.

error: Content is protected !!