Farmers Protest : धक्कादायक! शेतकऱ्यांवर पेलेटसचा वापर; तिघांची दृष्टी गेली, वैद्यकीय अहवालात माहिती!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पंजाब आणि हरियाणा राज्यातील शेतकरी 13 फेब्रुवारीपासून नवी दिल्ली येथे आंदोलन (Farmers Protest) करत आहेत. मात्र अशातच आता शेतकरी आंदोलनाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली असून, पतियाळा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या शरीरात पेलेटस आढळून आल्या आहेत. बलविंदर सिंह असे एका शेतकऱ्याचे नाव असून, या शेतकऱ्याच्या वैद्यकीय अहवालातून ही माहिती समोर आली आहे. शेतकरी बलविंदर सिंह यांच्यासहित एकूण 10 शेतकरी आंदोलनादरम्यान (Farmers Protest) पेलेट गनच्या वापरामुळे गंभीररीत्या जखमी झाले आहे. या गंभीर घटनेबाबत देशातील आघाडीच्या वृत्तसमूहाकडून वृत्त देण्यात आले आहे.

पेलेटस म्हणजे काय? (Farmers Protest In New Delhi)

पेलेटस म्हणजे काय तर सोप्या शब्दात या रबरी गोळ्या असतात किंवा मग खूपच लहान लोखंडी गोळ्या असतात. याबाबत पंजाबचे आरोग्यमंत्री डॉ. बलवीर सिंह यांनी जखमी आंदोलक शेतकऱ्यांची (Farmers Protest) हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. याबाबत बोलताना त्यांनी म्हटले आहे की, “पोलिसांकडून झालेल्या पेलेटच्या वापरामुळे तीन शेतकऱ्यांची दृष्टी गेली असून, एका शेतकऱ्याला चंदीगड तर दोघांना पतियाळा येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या तिघांसहित एकूण 10 शेतकऱ्यांच्या शरीरात मानेवर, हातावर, पोटावर आणि छातीवर धातूच्या लहान गोळ्या आणि रबरी छर्रे आढळून आले आहे.”

कधी झाला होता वापर?

शेतकरी आंदोलनाच्या पहिल्या व दुसऱ्या दिवशी 13, 14 फेब्रुवारी रोजी पोलिसांकडून आंदोलक शेतकऱ्यांना रोखण्यासाठी अश्रूधुराचा वापर करण्यात आला होता. त्याच दिवशी पोलिसांनी पेलेटसचा वापर केल्याचे सांगितले जात आहे. सुरुवातीच्या दोन दिवसांच्या पोलिसांच्या कारवाईनंतर, बलविंदर सिंह या शेतकऱ्यासह एकूण १० शेतकऱ्यांना पतियाळा येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात होते. तर काहींना इतर आसपासच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या सर्व शेतकऱ्यांच्या वैद्यकीय अहवालात पेलेटस वापराबाबत ही माहिती समोर आले आहे.

पोलिसांच्या बाजूने स्पष्टीकरण

दरम्यान, या संपूर्ण प्रकाराबाबत पोलिसांच्या बाजूने स्पष्टीकरण देताना हरियाणा पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी ममता सिंह यांनी अश्रुधुराशिवाय एक-दोन वेळा आम्ही रबरी बुलेट्सचा वापर केला. मात्र पेलेटचा (लोखंडी) वापर केलेला नसल्याचे म्हटले आहे. मात्र असे असले तरी शेतकऱ्यांच्या शरीरातुन छोटे लोखंडी छर्रे आढळून आल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आले आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या शरीरात अनेक भागात हे छर्रे असून, डॉक्टर काही प्रमाणात ते उपटून काढतात. मात्र, काही छर्रे हे शरीरात राहून जाण्याची भीती असते. ज्यामुळे कर्करोगाचा धोका संभवतो. असे आरोग्य क्षेत्रातील जाणकारांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!