Farmers Protest : शेतकरी आंदोलनाबाबत पंतप्रधान मोदींचे मोठे विधान; पहा… काय म्हणाले मोदी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील उत्तरेकडील राज्यांमध्ये आज (ता.10) शेतकरी रेल्वे वाहतूक रोखत आंदोलन (Farmers Protest) करत आहे. अशातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, सध्या देशातील शेतकऱ्यांना पहिल्यापेक्षा अनेक पटीने अधिकचा वाढवून हमीभाव दिला जात आहे. इतकेच नाही तर जेव्हापासून देशात भारतीय जनता पक्षाचे सरकार आले आहे. तेव्हापासून साखर कारख्यान्यांचा मनमानी कारभार थांबला असून, सर्वच राज्यांमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या उसाचे पैसे वेळेत मिळू लागले आहे. मागील 27 दिवसांपासून शेतकरी हमीभाव कायद्यासाठी आंदोलन (Farmers Protest) करत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे विधान महत्वाचे मानले जात आहे.

ऊस उत्पादकांची ससेहोलपट थांबली (Farmers Protest Prime Minister Modi’s Big Statement)

पंतप्रधान मोदी आज उत्तरप्रदेशातील आजमगड येथे जाहीर सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले आहे की ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारने यावर्षी एफआरपीमध्ये 8 टक्क्यांनी वाढ केली आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उसाला प्रति टन 3150 रुपयेहुन आता 3400 रुपये प्रति टन इतका दर मिळण्यास मदत होणार आहे. यावेळी त्यांनी जाहीर सभेत उपस्थित शेतकऱ्यांना साद घालत तुम्हाला या आधीच्या सरकारच्या काळात उसाच्या थकबाकीचे पैसे मिळण्यासाठी मोठ्या त्रास सहन करावा लागत होता. मात्र, आता वेळेत तुमच्या उसाचे पैसे मिळत आहे की नाही? अशी विचारणाही त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना साद घालत केली आहे.

‘सरकारने पळ काढू नये’

याउलट गेल्या 27 दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकरी (Farmers Protest) संघटनांनी म्हटले आहे की, केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी हमीभाव कायदा करावा. हमीभाव कायद्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला निश्चित हमीभाव मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे मोदी सरकारने आपल्या जबाबदारीपासून पळ काढू नये. शेतकऱ्यांनी आज रेल्वे वाहतूक रोखत शेतकरी आंदोलनाची धार आणखी वाढवली. त्यावेळी शेतकरी संघटनांनी केंद्र सरकारला हे आवाहन केले आहे.

error: Content is protected !!