Farmers Success Stories: गुजरातच्या महिला शेतकरी उत्पादक संघटनेने कृषी निविष्ठा विक्रीतून केली 1.85 कोटीची उलाढाल!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकरी उत्पादक संघटनेच्या (Farmers Success Stories) महिला सदस्यांनी कृषी बियाणे, सेंद्रिय औषधे यांच्या विक्री द्वारे यावर्षी सुमारे 1.85 कोटी रूपयांची उलाढाल केली आहे.  

गुजरातच्या (Gujrat) आदिवासीबहुल डांग जिल्ह्याच्या (Dang District) मध्यभागी, अर्ध-साक्षर महिलांच्या गटाने शेतकरी उत्पादक संघटना (FPO) हा कोट्यवधींचा व्यवसाय सुरू केला आहे. डांगमधील विविध खेड्यांमधून आलेल्या या उत्साही महिलांनी त्यांच्या परिश्रमातून हे यश (Farmers Success Stories) मिळवले आहे.

कृषी बियाणे (Crop Seeds) किंवा अवजारांची विक्री (Agriculture Equipment) असो, कंपनीने अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांचे जीवन बदलले आहे. या सक्षम महिलांनी समाजाचा विरोध धुडकावून त्यांच्या व्यवसायाची सुरुवात केली (Farmers Success Stories).

महिलांनी केलेल्या या संस्थेची स्थापना आणि देखभाल करणे सोपे नव्हते. सुरुवातीला मर्यादित बाजारपेठेमुळे, महिला शेतकरी त्यांच्या उत्पादनाची विक्री वैयक्तिकरित्या करत होत्या त्यामुळे   त्यांना कमी किंमत मिळून त्यांची आर्थिक स्थिती डळमळीत झाली होती.

आगा खान व्हिलेज सपोर्ट प्रोग्राम (इंडिया) (AKRSPI) या स्वयंसेवी संस्थेने नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि विविध कृषी तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी, आदिवासी महिलांचा समूह एकत्र केला. महिला गटाच्या (Women’s Group) कृषी कार्यांचे आयोजन करणे, त्यांच्या उत्पादनासाठी चांगली किंमत मिळवून देणे, त्यांची निर्णय क्षमता वाढविणे आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारणे हा या स्वयंसेवी संस्थेचा मुख्य उद्देश होता.

AKRSPI चे CEO नवीन पाटीदार यांनी डांगमधील शेतकर्‍यांना भेडसावणाऱ्या समस्येचा अभ्यास केल्यावर त्यांच्या लक्षात आले की मर्यादित शेतजमीन आणि प्रामुख्याने लहान किंवा अल्पभूधारक शेतकरी यांना त्यांच्या उत्पादनाची बाजारपेठेत विक्री करण्यात अडथळे निर्माण होतात. त्यावर मात करण्यासाठी, पाटीदार यांनी प्रशासन, विपणन आणि इतर आवश्यक क्षेत्रातील प्रशिक्षणाद्वारे या महिला सदस्यांना सामूहिक सहकारी म्हणून संघटित करण्याची योजना आखली (Farmers Success Stories).

त्यांनी या महिलांना गुजरात आणि मध्य प्रदेशमधील विविध शेतकरी उत्पादक संस्थांमध्ये (FPOs) प्रशासन, विपणनाचे प्रशिक्षण देण्यासाठी पाठवले जेणेकरुन त्यांना त्यांचा स्वत:चा व्यवसाय स्वतंत्रपणे चालवता येईल. यासाठी शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना जुलै 2019 मध्ये करण्यात आली. परंतु त्यानंतर कोविड लॉकडाऊनमुळे, या FPO ला महत्त्वाची कामे पूर्ण करण्यात अडथळे आले. तरीही कंपनीच्या स्थापनेपासून, कंपनीच्या महिला सदस्यांनी मागे वळून न पाहता सातत्याने प्रगती केली आहे (Farmers Success Stories).

या दृढनिश्चयी महिलांच्या एकत्रित प्रयत्नांतून जानेवारी 2023 पर्यंत एकूण 1,170 भागधारकांची अधिकृतपणे नोंदणी झाली आहे.

संस्थेच्या महिला कर्मचार्‍यांनी 2022-23 यावर्षी सुमारे 1.85 कोटी रूपयांची उलाढाल साधली आहे (Farmers Success Stories), प्रामुख्याने कृषी बियाणे, शेती उपकरणे, सेंद्रिय औषधे, मत्स्यबीज, पोल्ट्री फीड आणि इतर विविध उत्पादनांच्या विक्रीद्वारे आणि कमिशन द्वारे त्यांनी हे आर्थिक यश मिळविले.

“एफपीओच्या माध्यमातून, डांग गावातील लोकांना केवळ 300 रुपये प्रति किलो दराने भात बियाणे मिळतात आणि तेच बियाणे बाजारात 350 रुपये किलो दराने विकले जाते,” असे एफपीओचे सीईओ हसमुखभाई पटेल म्हणाले.

भाता व्यतिरिक्त, महिला एफपीओ द्वारे वांगी, मिरची, टोमॅटो आणि भाजीपाला बियाणे विकतात. पालक या भाजीपाला पिकाचे बियाणे डांगच्या 98 गावांमध्ये उपलब्ध आहेत. महाराष्ट्राच्या सीमावर्ती गावांतील शेतकरीही कमी खर्चात हे बियाणे घेण्यासाठी येतात.

पटेल अंजली गावित, म्हणतात की FPO सोबत संलग्न असलेल्या सर्व शेतकरी महिलांमध्ये  आत्मविश्वासाची भावना आहे. या महिलांनी पंचायतीच्या व्यासपीठाद्वारे स्वच्छ पाणी, रस्ते पायाभूत सुविधा आणि स्वच्छता सुविधा यासारख्या अत्यावश्यक समस्यांचे निराकरण करून त्यांच्या समुदायाची जबाबदारी सुद्धा घेतली आहे.

डांग येथील रहिवासी असलेल्या गमित गीता बेन यांनी FPS उपक्रमाचा एक भाग होण्याच्या फायद्यांबद्दल आपले विचार मांडले.

“आधी आमच्या आदिवासी भगिनींना एकत्रितपणे शेतीचे बियाणे घेण्यासाठी आमच्या गावाबाहेर जावे लागले असते. यामुळे केवळ अतिरिक्त वाहतूक खर्चच नाही तर संपूर्ण दिवस जायचा, कंपनीचा सदस्य झाल्यापासून, मी मा‍झ्या घरी बसून फोन कॉल करून आणि वाटाघाटी करून वाजवी दरात बियाणे मिळवू शकत आहे. शिवाय, आमच्या कंपनीचे नाव जिल्हा पातळीवर प्रसिद्ध आहे (Farmers Success Stories).

बोरखेड या गावातील सेजल बेन तिच्या समाजात 800 किलो भात बियाणे विकून कमिशन मधून उत्पन्न मिळवते. या महिला बियाणे विक्री कमिशन आणि कंपनीने विकलेल्या किचन गार्डन किट्स पॅकिंगच्या प्रत्येक वस्तूमागे दररोज 150 रुपये कमावत आहोत. परिणामी, त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे (Farmers Success Stories) असे त्या अभिमानाने सांगतात.

error: Content is protected !!