Farmers Success Stories: बाजरीच्या मूल्यवर्धनातून नफा कमावणारी, कर्नाटकची प्रयोगशील महिला शेतकरी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: कर्नाटकातील दावणगेरे जिल्ह्यातील नित्तूर गावातील रहिवासी (Farmers Success Stories) असलेली महिला शेतकरी श्रीमती सरोज एन. पाटील यांनी आपल्या शेतीतून एकात्मिक शेतीचा आदर्श घालून दिलेला आहे. बाजरीच्या शेतीतून नफा मिळवण्याच्या दिशेने त्यांनी उचललेल्या पावलांमुळे त्यांचे उत्पन्न तर वाढलेच शिवाय त्यांना एक यशस्वी उद्योजक महिला शेतकरी (Farmers Success Stories) म्हणून सुद्धा ओळख मिळाली.

सरोज पाटील यांच्याकडे 11 हेक्टर बागायती जमीन असून त्यात प्रामुख्याने ते भात, नाचणी (GPU-28 जातीची नाचणी) बाजरी, नारळ आणि सुपारीची लागवड करतात. याशिवाय त्यांच्याकडे 7 गायी, 6 म्हशी आणि पोल्ट्री फार्ममध्ये 12 हजार कोंबड्या सुद्धा आहेत.

आपल्या सर्वांना माहित आहे की बाजरी (pearl Millet) हे पौष्टिकतेने परिपूर्ण आहे आणि बऱ्याचदा ते थंड हंगामात खाण्याचा सल्ला दिला जातो कारण हे धान्य उष्ण प्रवृत्तीचे आहे.

पूर्वी लोक ज्वारी, बाजरी सारखे भरड धान्य (Millets) खायचे परंतु नंतर ती जागा गहू, तांदूळ या धान्यांनी घेतली. परंतु मागील काही वर्षात भरड धान्याचे महत्व सगळ्यांना कळायला लागले आणि आता शहरांतील लोकही त्यांच्या आहारात जास्तीत जास्त भरड धान्याचा वापर करायला लागले.

परंतु बाजरी सारखे फक्त भरड धान्य विकून पाहिजे तेवढा नफा मिळवता येत नाही. यातून नफा कमवायचा असेल तर या धान्याचे मूल्यवर्धन (Value Addition) करणे गरजेचे आहे. हे कर्नाटकच्या सरोज पाटील यांच्या लक्षात आले. आणि त्यांनी मूल्यवर्धन यूनिट (Processing Unit) उभारून बाजरीपासून इतर गोष्टी बनवून विकायला सुरुवात केली आणि चांगले उत्पन्नही (Farmers Success Stories) मिळवू लागलेत.

आधुनिक तंत्रज्ञानाने बाजरी लागवड (Modern Technology For Agriculture)

सरोज पाटील यांच्याकडे एक ट्रॅक्टर, चारा कापण्याचे यंत्र, तण नियंत्रणासाठी तीन कोनोवीडर मशीन, पिठाची गिरणी (लहान बाजरीपासून माल्ट तयार करण्यासाठी) या सर्व गोष्टी त्याच्या शेतात बसवल्या आहेत. सरोज आणि तिचे कुटुंब अनेक वर्षांपासून सेंद्रिय नाचणीचे उत्पादन करत आहेत.

साधारणपणे नाचणीचे पीक काढल्यानंतर ते थेट बाजारात विक्रीसाठी जाते. अशा प्रकारे नफ्याचे प्रमाण कमी होते. कारण पीक वाढवण्याचा खर्च, विशेषतः काढणी आणि मळणीचा खर्च जास्त असतो. हे पाहून सरोजने मूल्यवर्धन (Farmers Success Stories) करण्याचा विचार केला.

मूल्यवर्धित उत्पादने (Value Added Products)

सरोज यांनी 2014-15 मध्ये मूल्यवर्धन सुरु केले. सुरुवातीला नाचणी पासून माल्ट तयार करण्यासाठी एक छोटी पिठाची गिरणी सुरू केली. त्यांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांमध्ये माल्ट, एनर्जी मिक्स, लोणचे, बाजरीची रोटी, ड्रायफ्रूट्स लाडू, बाजरी पकोडा, नाचणी शेवया इत्यादींचा समावेश आहे.

ही सर्व उत्पादने FASSI अंतर्गत नोंदणीकृत ‘थडावनम’ या ब्रँड अंतर्गत विकली जातात. सरोजने तिच्या मूल्यवर्धन युनिटमधून 2019-20 मध्ये 1 लाख 49 हजार रूपयांचा नफा कमावला. बाजरीची लागवड करून त्यावर प्रक्रिया करून त्यांना त्यांच्या उत्पादनाला बाजारात चांगला भाव (Farmers Success Stories) मिळतो.

सरोज पाटील या कृषी विज्ञान केंद्राच्या (KVK) वैज्ञानिक सल्लागार समितीच्या सदस्याही आहेत. मूल्यवर्धनाशी संबंधित प्रशिक्षण घेतल्यानंतरच त्यांनी याची सुरुवात केली. बेंगळुरूस्थित ICAR-तारालाबालु कृषी विज्ञान केंद्राने त्यांना त्यांची उत्पादने ‘शनिवार ऑरगॅनिक बाजार’ (Organic Bazar) आणि त्यांच्या कॅम्पसमधील इतर प्रदर्शनांमध्ये विकण्याची संधी दिली.

शेती क्षेत्रात महिलांनी पुढाकार घ्यावा (Farmers Success Stories)

सरोज पाटील महिलांना आवाहन करतात की त्यांना त्यांच्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार शेतीच्या विविध क्षेत्रात सामील व्हावे. कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विभागाने आयोजित केलेल्या अनेक प्रशिक्षण कार्यक्रमात सरोज यांना प्रमुख पाहुणे म्हणून सुद्धा निमंत्रित करण्यात येते.  तेथे इतर शेतकऱ्यांसोबत सरोज त्यांचे अनुभव शेअर करतात. शेतकर्‍यांना त्या शेतीतील वेगवेगळ्या युक्त्या शिकवतात.

सन्मान आणि पुरस्कार (Awards & Recognition)

शेतीतील कामगिरीबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

2011 मध्ये कर्नाटक सरकारच्या ‘पर्यावरण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.  2008-09 मध्ये कर्नाटक सरकारचा ‘कृषी पंडित’ (Krushi Pandit) पुरस्कार आणि 2013 मध्ये महिंद्रा आणि महिंद्रा समूहाचा ‘महिंद्रा समृद्धी कृषी पुरस्कार’ (Mahindra Samridhhi Krishi Puraskar) सुद्धा त्यांना लाभलेला आहे.

error: Content is protected !!