Farmers Success Story: फक्त 18 गुंठ्यात ऊस पिकात घेतले वांग्याचे आंतरपीक; मिळविले सव्वा लाखांचे उत्पन्न!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतात गरजेनुसार बदल करणे (Farmers Success Story) आणि नवीन प्रयोग करणे ही आता काळाची गरज बनलेली आहे. शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळवायचे असल्यास एकाच पिकावर अवलंबून राहण्यापेक्षा आंतरपीक, मिश्र शेती, (Intercropping) यासारख्या पर्यायांचा अवलंब करणे गरजेचे आहे.

अशाच एका शेतकरी महिलेने आपल्या दोन मुलांच्या मदतीने ऊस पिकात (Sugarcane Crop) वांग्याचे आंतरपीक घेण्याचा प्रयोग केला आणि त्यातून लाखो रुपयांचे उत्पन्न (Farmers Success Story) सुद्धा मिळविले आहे.

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातून राजश्री वसंतराव पाटील आणि त्यांची मुलं सुनील व बाबू यांनी ही किमया (Farmers Success Story) साधली आहे.

राजश्री यांनी उसाच्या अर्धा एकरपेक्षा कमी जमिनीत वांग्याचे आंतरपीक (Brinjal Intercrop) घेऊन सव्वा लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. यामुळे सध्या या महिला शेतकऱ्याची पंचक्रोशीत चर्चा पाहायला मिळत आहे.

राजश्री पाटील यांनी आपल्या मुलांच्या मदतीने 15 सप्टेंबर 2023 ला उसाची लागवड केली होती. दरम्यान ऊस लागवड केल्यानंतर अवघ्या दहा दिवसांच्या काळात त्यांनी उसाच्या पिकात वांगी लागवड करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी वांग्याच्या त्रिशूला जातीची (Brinjal Variety) निवड केली. शेतात  सुरुवातीला गावाच्या उकिरड्यावरील खत टाकले. गावखत टाकल्यामुळे उसाच्या पिकाला आणि वांग्याच्या पिकाला चांगले पोषक घटक मिळाले आणि त्यांची चांगली वाढ झाली.

18 गुंठ्यात वांग्याची लागवड केली असून आता या वांग्याच्या पिकातून त्यांना उत्पादन देखील मिळू लागले आहे. दररोज 60 ते 70 किलो एवढे वांगे मिळत असून गेल्या दोन महिन्यात त्यांना अडीच टन मालाचे उत्पादन मिळाले आहे.

आजअखेर सव्वा लाख रुपयांची कमाई झाली आहे. विशेष म्हणजे आणखी दोन महिने त्यांना वांग्याच्या पिकातून उत्पादन मिळत राहणार आहे.

स्वतःच्या मेहनतीने आणि वेगळे काही करण्याच्या इच्छेने राजश्री यांनी आंतरपिकाचा एक नवीन प्रयोग सर्वांसमोर आणला आहे. शेतात नवीन काही करण्याचा विचार करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे नक्कीच प्रेरणादायी आहे.

error: Content is protected !!