Farmers Success Story: शेवग्याची लागवड आणि मूल्यवर्धनातून गुजरातमधील शेतकरी झाला लक्षाधीश!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: व्यवसायात सातत्य, (Farmers Success Story) मार्केटिंगचा योग्य अभ्यास आणि मूल्यवर्धन यामुळे कोणताही व्यवसाय यशस्वी करता येतो हे सिद्ध करून दाखविले आहे गुजरातच्या खेडा जिल्ह्यातील दुधेलीलात गावातील शेतकरी प्रवीण भाई पटेल यांनी (Farmers Success Story).  

प्रवीण भाई पटेल यांच्याकडे 10.7 हेक्टर जमीन आहे. ते पूर्वी पारंपारिक पद्धतीने एरंडेल, कापूस, चणे इं पिकांची लागवड करायचे. परंतु नंतर त्यांच्या लक्षात आले की पौष्टिक आणि औषधी मुल्य यामुळे शेवग्याला (Drumstick) गुजरात राज्यात प्रचंड मागणी आहे. त्यांच्या कौटुंबिक गरजा आणि जबाबदाऱ्यांसाठी त्यांच्या कृषी व्यवसायातून उत्पन्न वाढवण्यासाठी त्यांनी शेवग्याची लागवड (Drumstick Cultivation) करण्याचे ठरविले. यासाठी त्यांनी गुजरातमधील वसद येथील ICAR-इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन रिसर्च सेंटरला भेट दिली आणि त्यांच्या शेतात शेवग्याची लागवड करण्याची इच्छा व्यक्त केली (Farmers Success Story).

ICAR-IISWC च्या शास्त्रज्ञांनी (Agriculture Scientist) त्यांना शेवग्याच्या उत्पादनांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे सांगितले व त्यांनी प्रवीण भाई पटेल (Farmers Success Story) यांना शेवग्याची शेती करण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यांनी वैज्ञानिक उत्पादन तंत्र, रोपवाटिका वाढवणे, बियाणे उत्पादन आणि स्टेम कटिंगचे प्रशिक्षण दिले. त्यांनी त्याला इनपुट खर्च कमी करण्यासाठी स्टेम कटिंगचा वापर करण्याचा सल्ला दिला.

श्री. पटेल यांनी ICAR- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सॉइल अँड वॉटर कॉन्झर्व्हेशन, रिसर्च सेंटर (Indian Institute of Soil and Water Conservation Research Centre) वासद, गुजरात यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली 10.7 हेक्टरवर PKM-1 जातीच्या शेवग्याची (Drumstick Variety) लागवड करण्यास सुरुवात केली. इतकेच नाही तर त्यांनी ICAR-IISWC संशोधन केंद्रावरील प्रशिक्षण आणि कौशल्य विकास कार्यक्रमांना हजेरी लावली आणि तज्ज्ञांनी त्यांच्या शेतात छाटणी, खतांचा वापर, सिंचन वेळापत्रक, कापणी आणि वनस्पती संरक्षण उपायांबद्दल सल्ला दिला. शेवग्याच्या प्रचारासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरण्याचा सल्लाही त्यांना देण्यात आला (Farmers Success Story).

2008, 2016 आणि 2020 मध्ये त्यांनी (PKM-1) चे बियाणे, स्वतःचे बियाणे (सरगवी) आणि स्टेम कटिंगपासून अनुक्रमे 450, 1700 आणि 2580 शेवग्याच्या रोपांची (Drumstick Seedlings) लागवड केली.

त्यांना दरवर्षी 10.7 हेक्टर शेतातून 100 टन ताज्या ड्रमस्टिकच्या शेंगा मिळत आहेत आणि ते या शेंगा 35 रु.प्रति किलो या दराने कोलकाता, मुंबई, चेन्नई, अहमदाबाद, खेडा आणि वडोदरा सारख्या देशाच्या विविध भागांमध्ये विक्री केली. कापडवंज, नडियाड आणि बयाड यासारख्या स्थानिक बाजारपेठेत सुद्धा त्यांच्या शेवग्याला चांगली मागणी आहे.

शेवग्याला चांगला दर मिळावा आणि विपणन सुधारण्यासाठी प्रवीण भाई पटेल शेंगाची ग्रेडिंग (Drumstick Grading) करायला लागले. कोलकाता आणि मुंबईमध्ये बोटांच्या आकाराच्या शेवग्याच्या शेंगाला प्राधान्य दिले जाते आणि गुजरातच्या स्थानिक बाजारपेठांमध्ये अंगठ्याच्या आकाराच्या जाड शेंगांना  प्राधान्य दिले जाते हे त्यांच्या लक्षात आले (Farmers Success Story).  

ICAR-IISWC तज्ञांकडून मिळालेल्या तंत्रांचा आणि सल्ल्यांचा त्यांनी सातत्याने उपयोग केला आणि त्यातून भरीव उत्पन्न मिळवले. लागवडीचा खर्च, एकूण परतावा आणि निव्वळ उत्पन्न अनुक्रमे ₹ 100000/हेक्टर, ₹ 300000/हे, आणि ₹ 200000/हे. उत्पन्न मिळाले. दरवर्षी 10.7 हेक्टर क्षेत्रात ड्रमस्टिकच्या शेतीतून ते सुमारे 20 लाख रुपये कमावतात (Farmers Success Story).

एवढेच नाही तर शेवग्याचे मूल्यवर्धन (Value Addition Of Drumstick) वाढविण्यासाठी ड्रमस्टिकच्या पानांपासून आणि बियांपासून पावडर (Moringa Powder) आणि केसांचे तेल (Drumstick Oil) तयार करण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे. श्री. पटेल हे शेवग्याची पावडर रुपये 129 प्रति 100 ग्रॅम आणि केसांचे तेल रुपये 299 प्रति 50 मिली या दराने विकत आहेत. शेवग्याचे बियाणे रुपये 2000/किलो दराने विकूनही ते चांगले उत्पन्न मिळवत आहे.

श्री. प्रवीण भाई पटेल, शेवग्याच्या लागवडीमध्ये तज्ज्ञ झाले आहेत (Farmers Success Story), त्यांनी शेवगा लागवड आणि त्यांच्या मूल्यवर्धित उत्पादनांमधून नियमित आणि फायदेशीर उत्पन्न मिळवून त्यांचे जीवनमान सुधारले आहे. त्यांनी त्यांच्या शेतात 15 मजुरांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून दिले आहे. एवढेच नाहीतर लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना उच्च मूल्याची बागायती पिके घेण्यासाठी सुद्धा ते मार्गदर्शन करतात. त्यांच्या मार्गदर्शनाने सुमारे 150 शेतकऱ्यांनी ICAR-IISWC तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे, ज्यामुळे गरीब आणि तरुण शेतकऱ्यांना शेतीकडे आकर्षितच केले नाही तर शेती फायदेशीर आणि शाश्वत बनवण्यासाठी सुद्धा प्रेरित केले (Farmers Success Story).

error: Content is protected !!