Farmers Success Story: डी फार्मसीच्या विद्यार्थ्याने फुलशेतीतून कमवले चक्क 8 लाख रुपये!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या कृषी क्षेत्र हे भल्याभल्यांना भुरळ घालत आहे. (Farmers Success Story) शेती सोडून इतर क्षेत्रात उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी असो, किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात उच्च पदावर काम करणारे असो, प्रत्येकजण त्यांच्या क्षेत्राव्यतिरिक्त शेतीतही काहीतरी करायच्या मागे लागले आहेत. आणि यातूनच नवीन यशोगाथा (Farmers Success Story) तयार होत आहे.

असाच एक विद्यार्थी आहे जो शेतकरी झालेला आहे. या तरुण शेतकर्‍याचे नाव आहे गौरव कुमार आणि त्याचे वय आहे फक्त 22 वर्षे.

गौरव कुमार हा उत्तर प्रदेशातील लखनऊच्या मलिहाबाद येथील ढकवा गावातील रहिवासी आहे. त्याचे बारावीचे शिक्षण झाले असून सध्या तो डी फार्मसीचे शिक्षण घेत आहे. मात्र, शिक्षणासोबत शेतीवर पूर्ण लक्ष देत आहे.

गौरवचे वडील शिव कुमार हे भात तसेच गव्हाची शेती करायचे. मात्र, त्यांना अनेकदा नुकसान व्हायचे. अनेकदा वातावरणामुळे पीक खराब व्हायचे. त्यामुळे त्याने आपल्या वडिलांना सहयोग करण्यासाठी सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ सबट्रॉपिकल हॉर्टिकल्चरच्या माध्यमातून फुलांच्या लागवडीची माहिती मिळाली. त्यामुळे प्रत्येकजण गहू आणि भात पीक घेतो मग आपण नवीन प्रकारची शेती का करू नये, अशी कल्पना त्याने वडिलांना दिली. सुरुवातीला त्याच्या वडिलांना ते पटले नाही. पण नंतर त्यांनी होकार दिला.

गौरव 18 वर्षांचा असताना फुलशेती (Flower Cultivation) करायला सुरुवात केली आणि फक्त 4 महिन्यातच त्याने ग्लॅडिओलस फूलांच्या (Gladiolus Flowers) लागवडीतून तब्बल 8 लाख रुपयांची कमाई केली.

4 महिन्यातच होते ग्लॅडिओलस फुलांपासून कमाई (Farmers Success Story)

गौरवने सांगितले की, ग्लॅडिओलस फुलांची लागवड सप्टेंबरपासून सुरू होते. त्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीपर्यंत या फुलांची मुबलक विक्री होते. या फुलांच्या माध्यमातून अवघ्या चार महिन्यांत चार ते आठ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते.

आज अनेक तरुण असे आहेत, जे नोकरीऐवजी स्वत:चा व्यवसाय किंवा शेतीकडे वळताना दिसत आहेत. तसेच यात आपल्या मेहनतीने यशस्वी होतानाही दिसत आहे. विविध प्रकारची शेती तसेच व्यवसायाच्या माध्यमातून हे तरुण लाखो रुपयांची कमाई करताना दिसत आहेत. उच्च शिक्षण घेत असतांना सुद्धा गौरवने त्याचा परंपरागत शेती व्यवसाय सुद्धा जपला आहे. त्याने शेती व्यवसायाला आधुनिकतेचे स्वरूप दिले आहे. एवढ्या कमी वयात त्याने मिळवलेले यश (Farmers Success Story) खरच कौतुकास्पद आहे.

error: Content is protected !!