Farmers Success Story: वैज्ञानिक शेतीने बाजरीचे तिप्पट उत्पादन; माडग्याळ गावातील शेतकरी गटाची कमाल!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील माडग्याळ गावातील शेतकर्‍यांच्या गटाने (Farmers Success Story) बाजरीचे तिप्पट उत्पन्न मिळवण्याच्या उद्देशाने, पारंपरिक शेती तंत्राच्या जागी वैज्ञानिक शेती तंत्राचा वापर करून शेतीच्या पद्धती बदलण्याचा निर्णय घेतला आणि तो अंमलात सुद्धा आणला (Farmers Success Story).

सांगली (Sangali) सारख्या ऊस उत्पादक जिल्ह्यांमध्ये कामाच्या शोधात शेतकर्‍यांचे स्थलांतर (Migration of Farmers) माडग्याळच्या शेतकर्‍यांसाठी सामान्य आहे. शेतकरी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पारंपारिक शेती  तंत्राचा उपयोग करायचे परंतु यात पुरेसे कृषी उत्पादन मिळत नव्हते. याचा परिणाम केवळ गावातील एकूण शेती पद्धतीवर तर झालाच शिवाय सामाजिक स्तरावर बघितल्यास मुलांच्या शिक्षणावर आणि इतर जिल्ह्यांतील शेतमजूर (Agriculture Labor) म्हणून त्यांच्या व्यस्ततेवर सुद्धा झाला.

या सर्व समस्येवर उपाय म्हणून माडग्याळ गावातील सुमारे 25 शेतकर्‍यांनी गट शेती (Group Farming) सुरू केली आणि पारंपरिक शेती पद्धतीच्या जागी ठिबक सिंचन, नवीन तंत्रे आणि उच्च उत्पन्न देणारे हायब्रीड जातीचे बाजरी बियाणे (Bajara Seeds) प्रदान करण्यात आले. यामुळे शेतकर्‍यांना 2700-4300 किलो/एकर उत्पादन मिळू शकले, जे राष्ट्रीय सरासरीच्या तिप्पट (Farmers Success Story) आणि राज्याच्या सरासरीच्या दुप्पट आहे. यासाठी शेतकर्‍यांच्या गटाला राज्याच्या कृषी विभागाने पाठिंबा दिला होता.

पीक खराब होऊ नये म्हणून बियाण्यांची उगवण क्षमता (Seed Germination) तपासण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. सेंद्रिय खत (Organic Fertilizer) वापरण्यावर भर देण्यात आला. शेतकर्‍यांना बाजरी प्रतवारी करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले कारण ते जास्त भाव मिळवून देते, तसेच त्यांच्या उत्पन्नाच्या संधी वाढवण्यासाठी मेट्रो शहरे आणि किरकोळ मॉल्समध्ये बाजरी मार्केटिंगसह शेतकर्‍यांना ठिबक सिंचनाद्वारे (Drip Irrigation) पाण्याचा विवेकपूर्ण वापर, बियाणे उगवण तपासण्याचे तंत्र (Farmers Success Story) शिकवण्यात आले.  

लागवडीपूर्वी 100 बिया ओलसर गोणीत ठेवल्या जातात ज्यापैकी किमान 80 बियाणे 72 तासांनंतर उगवले तर ते बियाणे लागवडीसाठी योग्य आहे असे ते ओळखायचे. जेणेकरून पिकांचे उत्पादन जास्त होईल.

बदलत्या शेती तंत्रामुळे, ते 2700-4300 किलो/एकर जास्त उत्पादन मिळवू शकले, ज्यामुळे त्यांच्या  मोती बाजरीला उच्च भावासह 75,000  रू. नफा मिळाला.

या बचत गटातील शेतकऱ्यांना वाटते की वैज्ञानिक तंत्राने शेती करून चांगले उत्पादन (Farmers Success Story) मिळविणे हे त्यांचा शेतमजूर म्हणून स्थलांतर सारख्या समस्या सोडविण्यास मदत करेल. एवढेच नाही तर लोकांना अन्नधान्याचा अधिक पोषक पर्याय उपलब्ध करून देता येईल. उत्पादन वाढत राहिल्यास लवकरच बाजरी गावातील लोकांच्या दैनंदिन भागाचा भाग होईल, ज्यामुळे स्त्रिया मासिक पाळीच्या वेदनापासून मुक्त होऊन उसाच्या शेतात कोणत्याही व्यत्ययाशिवाय काम करू शकतात.  तसेच बाजरीतून मिळणाऱ्या नफ्यामुळे स्थलांतर कमी होऊन मुलांना चांगले शिक्षण घेता येईल (Farmers Success Story).

शेतकर्‍यांच्या यशोगाथा (Farmers Success Story) यामधून आजपर्यंत आपण अधिक उत्पन्न मिळवण्याचा उद्देश बघितला आहे. परंतु या शेतकर्‍यांनी त्यांच्या घरच्या स्त्रिया आणि मुलांच्या भविष्यासाठी केलेले हे प्रयत्न खरंच अभिमानास्पद आहे.

error: Content is protected !!