Farmers Success Story: मुलीला झालेल्या कर्करोगाने डोळे उघडले; सेंद्रिय शेतीकडे पाऊल वळविले!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: ‘मा‍झ्या शेती पद्धतीमुळे (Farmers Success Story) भविष्यातील पिढ्यांचे आरोग्य जपले जाईल आणि ते निरोगी राहतील’ हे वाक्य आहे पंजाबमधील एका शेतकरी महिलेचे . या शेतकरी महिलेने (Woman farmer) तिच्या आयुष्यात घडलेल्या एका कठीण प्रसंगातून धडा घेत सेंद्रिय शेतीकडे आपली वाटचाल सुरू केली, आणि यातून सामाजिक कार्य (Farmers Success Story) सुद्धा करता येते हे तिला उमगले.

पंजाबची शेती (Punjab Farming) म्हटली की आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ते शेतीत अमर्यादित रसायनांचा वापर (Unlimited Use of Chemicals) आणि त्यामुळे नापीक झालेली जमीन (Infertile Land).

अशीच काही परिस्थिती पंजाबच्या होशियारपूरच्या निला नलोया गावात राहणाऱ्या मनजीत कौर या शेतकरी महिलेची होती.

2008 पर्यंत मनजीत कौर आणि कुटुंबिय हे इतर शेतकर्‍यांप्रमाणे, पारंपरिक ऊस शेती (Sugarcane Farming) लागवड करत होते. ऊस म्हटले की रासायनिक खतांचा भरमसाठ वापर येणारच. त्यानुसार ते सुद्धा शेतात खतांचा वापर करत होते.

मात्र एक दिवस मनजीत कौर यांच्या मुलीला कर्करोगाचे निदान झाले आणि त्याक्षणी त्यांचे सर्व आयुष्यच बदलले. पिकांमध्ये रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या वापरामुळे कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मुलीला रसायने आणि खतामुळे कर्करोग झाल्याचे निदान झाले, तेव्हा मनजीत कौर यांनी त्यांच्या समोर उभ्या राहलेल्या या आव्हानाला तोंड द्यायचे ठरविले आणि सुरू झाला सेंद्रिय शेतीचा (Farmers Success Story) प्रवास.

तेव्हापासून मनजीत कौर यांनी कौटुंबिक गरजेसाठी 17 एकर जमिनीवर सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला (Organic vegetable) पिकवायला सुरुवात केली. यादरम्यान मृद व जलसंधारण विभाग, होशियारपुर यांनी 2008-09 मध्ये स्वयं-सहायता गटांना आणि कंडी क्षेत्राला मदत करण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या प्रकल्पाशी त्या जोडल्या गेल्या. या प्रकल्पा दरम्यान, त्यांना कृषी विज्ञान केंद्र, बहोवाल येथे प्रशिक्षण अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याची संधी मिळाली. कृषी विज्ञान केंद्राने आयोजित केलेल्या सर्व प्रशिक्षण वर्गातही (Organic Farming Training) त्या सहभागी झाल्या. या प्रशिक्षण सत्रांद्वारा, कौर यांना सेंद्रिय शेती पद्धती व्यावसायिक स्तरावर (Farmers Success Story) कसे वाढवायचे याविषयी तांत्रिक ज्ञान मिळाले. 2013 पासून, ते त्यांच्या शेतात शेणापासून तयार केलेले कंपोस्ट खत (Farmers Success Story) वापरत आहे.

मनजीत कौर यांच्या शेतात सध्या हळद (Turmeric), आले (Ginger) ही पिके सेंद्रिय पद्धतीने घेतली जातात. शिवाय ते सेंद्रिय गुळनिर्मिती (Organic Jaggery) सुद्धा करतात. शेतीला जोडव्यवसाय म्हणून त्या मधमाशीपालन (Beekeeping), दुग्ध व्यवसाय (Dairy Business), आणि कुक्कुटपालन (Poultry Farming) असे व्यवसाय करतात (Farmers Success Story). एवढेच नाही तर वेगवेगळे फरसाण आणि दही बुंदी यासारखे खाद्यपदार्थ सुद्धा ते तयार करून विकतात.

मनजीत कौर यांचे एकत्र कुटुंब असून त्यांच्या गावातील 20 शेतकऱ्यांना त्यांनी रोजगार दिलेला आहे.

त्यांचे उत्पादन जालंधर आणि होशियारपुर येथे तसेच कृषी विज्ञान केंद्राद्वारा विकले जातात. मनजीत कौर अनेक महिलांच्या नेतृत्व गटाचे सभासद आहेत. ते इतर शेतकऱ्यांना (Farmers Success Story) बाजारातील दर,  शेतीसाठी अचूक सिंचन पद्धती, विपणन आणि उत्पादनाची विक्री याबद्दल प्रशिक्षित करतात.

मनजीत कौर यांना त्यांच्या कार्याबद्दल ‘सरदारणी प्रकाश कौर’ (Sardarni Prakash Kaur Sra Memorial Award) स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ते करत असलेल्या शेती पद्धतीची पाहणी करण्यासाठी आलेल्या पंचांनी त्यांना या पुरस्कारासाठी नामांकित केले होते. मनजीत कौर यांना वाटते की “स्त्रियांनी कुटुंबातील सर्व कार्यात पुढाकार घेतला पाहिजे.  त्यांच्यासाठी मुलाचे आरोग्य सर्वात महत्वाचे आहे. सेंद्रिय पद्धतीने शेती (Organic farming) करणे हे त्यांच्यासाठी खूप प्रेरणादायी आणि फायद्याचे आहे (Farmers Success Story)असे त्या मानतात.

error: Content is protected !!