Farmers Success Story: 10 एकरांवर 180 वेगवेगळी पिके घेतो ‘हा’ शेतकरी; युएई आणि अमेरिकेतील ग्राहकही होतात आकर्षित!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: काही शेतकरी (Farmers Success Story) काळासोबत शेतीत बदल करतात तर काही शेतकरी काळाच्या पुढचा विचार करून भविष्यात निर्माण होणार्‍या संधीची चाहूल घेऊन अगोदरच शेतीत बदल करायला लागतात. असाच एक शेतकरी म्हणजे महाराष्ट्रातील खेडा गावातील अजय जाधव (Farmers Success Story).

90 च्या दशकात सेंद्रिय शेती (Organic Farming) हा शब्दप्रयोग होण्याच्या खूप आधीपासून ते त्यांच्या 10 एकर जमिनीवर त्याचा सेंद्रिय शेतीचा सराव करत होते.

आज व्हॉट्सॲप समुदायाच्या मदतीने अजय जाधव त्याच्या शेती उत्पादनांची युएई आणि अमेरिकेतही विक्री करून महिना लाखो रुपयाची कमाई सुद्धा करतात (Farmers Success Story).

“शेती हा इतर कोणत्याही व्यवसायाप्रमाणे फायदेशीर आहे हे मला सिद्ध करायचे आहे” असे अजय जाधव म्हणतात,

2005 मध्ये, अजय जाधव यांचा मोठा भाऊ आणि व्यवसायिक भागीदार यांचे निधन झाले तेव्हा त्यांच्यासाठी सगळे जगच संपले असे त्यांना वाटू लागले. सेंद्रिय शेतीतून खेडा गावातील दोन भावांनी 200% नफा कमावत एक डेअरी फार्मही यशस्वीपणे चालवला होता, परंतु 2005 मध्ये भावाचे निधन झाल्यानंतर अजय जाधव यांनी व्यवसाय सोडला.

जाधव यांना व्यवसायाची अनोखी जाण होती पण वैयक्तिक आयुष्यात झालेली हानी आणि सरकारी नियमांमुळे ते 2010 पर्यंत मागे पडले. सेंद्रिय शेतीमुळे त्यांचा निविष्ठा खर्चही वाढतच गेला. पण इथेच आणखी एक यश अजय जाधव यांची वाट पाहत होते (Farmers Success Story).

नैसर्गिक शेतीद्वारा शेतीचे भाग्य बदलले

2010 मध्ये, अजय जाधव यांनी आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये नैसर्गिक शेतीचे (Natural Farming) प्रशिक्षण घेतले.

नैसर्गिक शेतीमुळे पुरेसे उत्पन्न मिळत नाही आणि परिणाम दिसायला बराच वेळ लागतो, ज्यामुळे नुकसान होऊ शकते या समजामुळे शेतकरी सुरुवातीला त्यांच्या शेती पद्धतीत बदल करण्यास कचरतात. मात्र जाधव यांना नैसर्गिक शेतीकडे जाण्याचा हा निर्णय फारसा विचार करायला लावणारा नव्हता.

आर्ट ऑफ लिव्हिंग (Art Of Living Farming) मधून मिळालेल्या प्रशिक्षणातून जाधव यांनी घरच्या घरी नैसर्गिक निविष्ठा कसे बनवायचे हे शिकून घेतले. “आधीही मी सेंद्रिय शेती करत होतो, पण इथे नैसर्गिक शेतीचे तंत्र लागू केल्यानंतर, माझा उत्पादन खर्च लक्षणीयरीत्या कमी झाला” असे ते म्हणतात.

नैसर्गिक शेतीमुळे माझे उत्पन्न दुप्पट झाले. माझ्याकडे 10 एकर जमीन आहे आणि मी 180 वेगवेगळी पिके घेतो. माझ्या शेतातून गूळ (Premium Jaggery) हे प्रिमियम उत्पादन तयार केले जाते, जे चवीला अतिशय स्वादिष्ट असून जसजसे जुने होत जाते तसतसे ते अधिक चवदार होते. लोक ते अगदी 200 रुपये/किलो दराने विकत घेतात. वर्षभरानंतरही माझा गूळ काळा होत नाही असे ते अभिमानाने सांगतात.

नैसर्गिक शेती आणि बहु-पीक तंत्राच्या सहाय्याने जाधव यांनी 180 हून अधिक पिके असलेले मॉडेल फार्म (Model Farm) तयार केले आहे. त्यांचे हे ज्ञान इतर शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जाधव यांनी त्यांच्या शेताला एक मॉडेल फार्म बनवले आहे जिथे कोणीही सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत भेट देऊ शकतो आणि ते राबवत असलेल्या तंत्रांबद्दल जाणून घेऊ शकतात. 5 लाखांहून अधिक शेतकर्‍यांनी आतापर्यंत त्यांच्या मॉडेल फार्मला भेट दिली आहे जिथे ते त्यांना उत्पादनाचे पॅकेजिंग, प्रक्रिया आणि ब्रँडिंगचे प्रशिक्षण देखील देतात. अशा भेटींनी त्याला विश्वासार्हता निर्माण करण्यास मदत केली आहे आणि आता शेकडो कुटुंबे त्याच्याकडून लाखो किमतीच्या निरोगी, पौष्टिक आणि नैसर्गिक रित्या पिकवलेल्या भाज्या खरेदी करतात (Farmers Success Story).

जाधव यांच्या शेतात 200 प्रकारच्या भाज्या (Vegetable Cultivation), 200 प्रकारचे उपपदार्थ आणि 300 विविध प्रकारच्या देशी बिया (Desi Seeds) आहेत.

त्यांचे उत्पादन भारतातील 21 राज्यांमध्ये पुरवले जाते. ग्राहक त्यांच्याकडून खरेदी करून अमेरिकेत निर्यात करतात. दर आठवड्याला 3000 रूपयांची भाजी खरेदी करणारे ग्राहकही त्यांच्याकडे आहेत. संकटावर मात करून दरवेळी नवी संधी शोधणारे अजय जाधव यांची यशोगाथा (Farmers Success Story) सर्वांसाठी खरच प्रेरणादायी आहे.

error: Content is protected !!