Farmers Success Story: चहा विक्रेता ते कृषी उद्योजक; कोरफड पासून 40 उत्पादने तयार करणारा शेतकरी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: यश (Farmers Success Story) मिळवायचे असल्यास कठोर परिश्रमाला पर्याय नाही, कारण यश फक्त त्यांच्याच पदरात पडते जे मेहनतीला घाबरत नाहीत. अशीच एक कहाणी राजस्थानच्या हनुमानगढ जिल्ह्यात राहणार्‍या अजय स्वामी या प्रगतीशील शेतकर्‍याची आहे (Farmers Success Story).

अजय स्वामी कोरफडसह अनेक पिकांची यशस्वीपणे लागवड तर करतातच शिवाय त्यावर प्रक्रिया करतात, दरमहा 1 ते 1.5 लाख रुपये नफा (Farmers Success Story)सुद्धा मिळवतात.

परंतु अजय हे अगोदर पासून शेतीच करत होते असे नाही. सुरुवातीच्या काळात अजय स्वामी चहाचे दुकान चालवत असत पण त्यांच्या क्षमतेमुळे ते चहा विक्रेत्यापासून कृषी उद्योजक (Agricultural Entrepreneur) बनले आहेत.

चहा विक्रेता ते कृषी उद्योजक प्रवास (Farmers Success Story)

अजय यांचे शिक्षण आठवीपर्यंत झाले आहे. त्यांच्या लहानपणीच वडीलांचे निधन झाल्याने  लहान वयातच त्यांच्यावर जबाबदारी आली. त्यावेळी त्याच्याकडे कोणतेही आर्थिक साधन नसल्यामुळे त्यांना लहानपणापासूनच काम करावे लागले. या काळात त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले पण त्यांनी हार मानली नाही. अशा परिस्थितीत अजय स्वामी यांचा चहा विक्रेता (Tea Seller) म्हणून काम करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी चहाचे दुकान (Tea Stall) चालवले आणि काही वर्षे नोकरीही केली.

त्यानंतर त्यांनी शेती करण्याचे ठरविले. कमी खर्चात, कमी वेळेत आणि कमी पाण्यात चांगले उत्पादन मिळावे म्हणून शेतीत काहीतरी नवीन करायचे असे त्यांनी ठरविले होते. त्यावेळी अजयला कोरफड लागवडीची (Aloe Vera Farming) माहिती मिळाली जी कमी पाण्यातही टिकते म्हणजेच पाण्याअभावीही लवकर सुकत नाही. एकदा लागवड केल्यावर कोरफडीचे रोप तीन ते चार वर्षे पाण्याशिवाय उभे राहू शकते.

अजय स्वामी यांच्या मते, शेती करताना त्यांना सर्वात मोठी समस्या भेडसावत असते ती म्हणजे सिंचनासाठी पाण्याची कमतरता कारण त्यांचे गाव दुष्काळी भागात येते. त्यामुळे कोरफडीची (Aloe Vera) लागवड करणे त्यांना फायदेशीर वाटले. व त्यांनी कोरफड सोबत इतर पिकांची लागवड करण्यास सुरुवात केली (Farmers Success Story).

सेंद्रिय पद्धतीने कोरफडीची लागवड (Farmers Success Story)

अजय स्वामी यांनी सांगितले की, पूर्वी त्यांच्याकडे फक्त दोन बिघे जमीन होती. कोरफड लागवडीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यांनी 25 बिघा अधिक लागवड योग्य जमीन खरेदी केली आहे. ते कोरफड पिकामध्ये शेणखत घालतात (Organic Aloe Vera) कारण त्यात रासायनिक खते टाकली जात नाहीत. अजय  कोरफडच्या बार्बाडेनसिस (Barbadensis) जातीची लागवड करतो. अजय स्वामी त्यांच्या इतर पिकांना ठिबक सिंचनाद्वारे (Drip Irrigation) पाणी देतात.

शेती ते कृषी उद्योजक प्रवास (Farmers Success Story)

अजय स्वामी यांनी सांगितले की, शेतीसोबतच त्यांनी नंतर कोरफडीवर प्रक्रिया (Aloe Vera Processing) करून उत्पादने बनविण्याचे ठरविले. कोरफडीवर प्रक्रिया कशी होते, त्यातून उत्पादने कशी तयार होतात हे त्यांना  माहीत नव्हते. पण त्याने हार न मानता कोरफडीवर प्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांमध्ये जाऊन त्याची माहिती घेतली. त्यांनी योग्य प्रशिक्षण घेतले आणि नंतर स्वत: उत्पादन बनवण्यास सुरुवात केली. जेव्हा त्याने कोरफडवर प्रक्रिया सुरू केली तेव्हा त्याच्याकडे एक लहान मिक्सर ग्राइंडर होता ज्याने ते रस बनवायचे. पण आता त्यांच्याकडे या कामासाठी अनेक मोठमोठी मशीन्स आहेत. त्यांनी सांगितले की, ते सध्या कोरफडीचे लाडू, रस, साबण, मलई, कोरफडीचे जेल, च्यवनप्राश, नमकीन आणि बिस्किटे इत्यादी 30 ते 40 प्रकारची उत्पादने (Aloe Vera Products) बनवत आहेत. ‘स्वामीजी’ या ब्रँडच्या नावाखाली ते त्यांची ही उत्पादने विकतात. त्यांची सगळी उत्पादने ते ऑफलाइन विकतात.

दिल्ली ते गंगानगर महामार्गावर त्यांचे एक दुकान आहे जिथे ही सर्व उत्पादने तयार केली जातात. याशिवाय ते त्यांनी उत्पादित केलेले कोरफड अनेक कंपन्यांना विकतो. आतापर्यंत लुधियाना, दिल्ली, चंदीगड आणि अंबाला येथील 15 ते 20 कंपन्यांनी त्यांच्याकडून कोरफड विकत घेतली आहे.

पाऊस पडला की कोरफडीचे चांगले उत्पादन मिळते

अजय स्वामी यांनी सांगितले की कोरफडीचे चांगले उत्पादन पावसावर अवलंबून असते. चांगला पाऊस झाला तर वर्षातून दोनदा उत्पादन घेता येते. पाऊस चांगला नसला तर वर्षातून एकदाच उत्पादन मिळते. यावेळी ते ठिबक पद्धतीचा वापर करतात.

कोरफड हे असे पीक आहे की त्याची एकदा लागवड केल्यास वर्षानुवर्षे पैसे कमावता येतात. एका पानाचे उत्पादन 400 ते 500 ग्रॅम असते आणि एका बिघामध्ये सुमारे 200 क्विंटल उत्पादन (Aloe Vera Production) मिळते.

शेतकर्‍यांनी स्वत:च्या मालाचे मार्केटिंग करून विक्री करावी (Farmers Success Story)

अजय स्वामी सांगतात की शेतकर्‍यांनी त्यांच्या उत्पादनांची मार्केटिंग (Products Marketing) आणि विक्री कशी करावी हे समजून घेणे आवश्यक आहे.

बहुतांश शेतकरी आपले पीक आणि उत्पादन विकण्यासाठी देशातील विविध बाजारपेठेत जातात, परंतु मध्यस्थांमुळे त्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. अशा परिस्थितीत शेतकरी स्वत: त्यांच्या उत्पादनावर प्रक्रिया करू शकतात, त्यांच्या घरी उत्पादने तयार करू शकतात आणि त्यांची विक्री करू शकतात जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त नफा मिळू शकेल. त्यामुळे शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती आणखी मजबूत होऊन ते स्वावलंबी होतील.

चहा विक्रेता ते शेतकरी, प्रक्रिया उद्योजक (Farmers Success Story)असा अजय स्वामी यांचा प्रवास खरंच सर्वासाठी प्रेरणादायी आहे.

error: Content is protected !!