Farmers Success Story: शेतकरी ते महिला उद्योजक; प्रयोगशील शेतकरी महिलेची भरारी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: आधुनिक शेती (Farmers Success Story) करणे भल्याभल्यांना जमत नाही, त्यात एका शेतकरी महिलेने आधुनिक शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. फक्त निर्णय घेऊन त्या थांबल्या नाहीत तर शेतीसाठी लागणारी सर्व कामे पार पाडून येणार्‍या अडचणींचे समर्थपणे निवारण सुद्धा केले आहे.

नाशिक जिल्ह्यातील दाभाडी येथील या प्रयोगशील महिलेचे नाव आहे भावना निळकंठ निकम (Farmers Success Story).

पदवीपर्यंत शिक्षण झालेल्या भावना साधारणपणे 13 वर्षापासून शेती व्यवसायात आहे. भावना निकम यांच्याकडे 6 हेक्टर जमीन असून त्यात प्रामुख्याने द्राक्ष, डाळींब, टोमॅटो, पॉली हाऊस व शेडनेट मध्ये शिमला मिरची व इतर भाजीपाला पिके (Crop Production) घेतली जातात.

परंपरागत शेतीऐवजी आधुनिक (Modern Farming) तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उत्पादन खर्चात बचत करून उत्पादन वाढीवर त्या भर देतात.

आधुनिक आणि शाश्वत शेतीसाठी त्यांनी अत्यावश्यक असणाऱ्या पाण्याच्या उपलब्धतेसाठी शेतात सव्वा कोटी लिटर पाण्याची क्षमता असणारे शेततळे उभारले आहे. मजूरांची समस्या, वेळ व खर्चात बचत व्हावी म्हणून कृषि विभागाच्या मदतीने ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलीत अवजारे जसे ब्लोअर, रोटाव्हेटर, पल्टी नांगर, कल्टीवेटर इत्यादी कृषि यांत्रिकीकरणाची (Agriculture Mechanization) शेतीला जोड दिली आहे.

एकात्मिक पीक व्यवस्थापन (Integrated Crop Management)

पिकांवर निव्वळ रासायनिक किटक नाशकांची फवारणी न करता एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करुन ट्रायकोकार्ड, निंबोळी अर्क, दशपर्ण अर्क याच्यासोबतच फेरोमन ट्रॅप्स, पक्षी थांबे यांचाही वापर त्या करत आहेत. खर्चात बचत व्हावी व पीक उत्पादन गुणवत्ता वाढावी यासाठी सेंद्रीय खते जसे कंपोस्ट खत, गांडुळखत, हिरवळीचे खत, बायोगॅस स्लरीचा वापर करुन जमीनीची सुपीकता वाढवली आणि टिकवली आहे. एवढेच नाही तर बाजाराभावाचा कल, जमिनीचा स्तर व पीक फेरपालट यांचा विचार करुन ते पिके घेतात. शेतीला जोडधंदा म्हणून 12 हजार पक्षांचे कुक्कुट पालन शेड उभारुन व्यवसाय सुरु केला आहे.  

शेती करतांना शेतीतील जवळपास सर्वच कामे जसे निंदणी, फवारणी, ट्रॅक्टरचलीत साधनांचा वापर करणे एवढेच नव्हे तर ट्रॅक्टर चालविणे, बाहेर गावावरुन शेतमजुरांना कामासाठी शेतात आणने यासारखे कामेही मी वेळप्रसंगी करतात. शेतातील व घरातील विद्युत जोडणी, पाईपलाईन त्यासंबंधातील दुरुस्ती अशी जुजबी कामे करुन येणाऱ्या अडचणींना ते समर्थपणे निवारतात. शेतीसंदर्भात सर्व निर्णय घेण्याची पूर्णत: जबाबदारी कुटूंबाने मला दिलेली आहे असे त्या आवर्जून सांगतात. 

कृषिक्रांती महिला फॉर्मर प्रोड्युसर कंपनी (Farmer Producer Company)

परिसरातील सर्व शेतकऱ्यांना रास्त दरात चांगल्या दर्जाची खते, बियाणे, किटक नाशके उपलब्ध व्हावीत म्हणून तालुक्यातून वेगवेगळया गावांमधील महिलांनी एकत्रित येवून तालुकास्तरावर कृषिक्रांती महिला फॉर्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली आहे. या कंपनीच्या अंतर्गत गावपातळीवर राजमाता महिला फॉर्मर प्रोड्युसर कंपनीची दाभाडीत स्थापना केली आहे. यातून वेगवेगळे लघु उद्योग करून शेतीशाळा, शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक यांचा महिलांना फायदा करून देत आहेत.

महिला सक्षमीकरण करण्यासाठी मोफत ब्युटी पार्लर, शिवणक्लास, होमकुकचे वर्ग चालू केले. भावना निकम यांच्या कार्याची दखल घेत आदर्श महिला शेतकरी म्हणून विविध संघटना व सेवाभावी संस्थानी गौरव देवून पुरस्कृत (Farmers Success Story) केले आहे.

एवढेच नाही तर 2019 चा शिवाजी महाराज कृषी सन्मान पुरस्कार तसेच सर्वोत्कृष्ट महिला शेतकरी पुरस्कार (कृषरत्न पुरस्कार), शेतीनिष्ठ पुरस्कार, रोटरी क्लब आदर्श महिला शेतकरी पुरस्कार, व 2021 चा अभिनववादी महिला शेतकरी पुरस्कार हे वेगवेगळे सन्मान (Farmers Success Story) त्यांना लाभले आहे.

एवढ्या कमी वेळात आणि वयात भावना यांनी आकाशाला गवसणी घालणारे यश मिळविले आहे. त्यांचे यश (Farmers Success Story) खरंच कौतुकास्पद आहे.

error: Content is protected !!