Farmers Suicide : महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या; एनसीआरबीचा अहवाल जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) ने 2022 सालासाठीचा आपला वार्षिक अहवाल (Farmers Suicide) जाहीर केला आहे. यामध्ये देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये यावर्षी वाढ झाली असून, जवळपास 11,290 शेतकऱ्यांनी (Farmers Suicide) आपले जीवन संपवले आहे. यात 6,083 शेतमजूर, 5,472 पुरुष शेतकऱ्यांचा तर 611 महिला शेतकऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक 4 हजार 248 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे.

सोमवारी (ता.४) जाहीर करण्यात आलेल्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालात (Farmers Suicide) म्हटले आहे की, 2021 मध्ये देशात एकूण 10 हजार 281 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. ज्यात यावर्षी 3.7 टक्क्यांनी वाढ झाली असून, यावर्षी देशातील शेतकरी आतमहत्येचा आकडा 11 हजार 290 पर्यंत पोहचला आहे. दरम्यान, 2020 मधील शेतकरी आत्महत्त्यांच्या आकडेवारीच्या तुलनेत यावर्षीचा आकडा 5.7 टक्क्यांनी अधिक आहे. महारष्ट्रानंतर कर्नाटक या राज्यामध्ये सर्वाधिक 2 हजार 392 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे. आंध्रप्रदेशात हा आकडा 917 इतका आहे. दिलासादायक म्हणजे पश्चिम बंगाल, ओडिसा, उत्तराखंड, गोवा, मणिपुर, त्रिपुरा, मिझोराम, चंदीगड, लक्षद्वीप व पुदुचेरी एकही शेतकरी आत्महत्येची नोंद यावर्षी झालेली नाही.

53 टक्के शेतमजुरांचा समावेश (Farmers Suicide In Maharashtra)

या अहवालानुसार, मागील वर्षी देशातील शेती क्षेत्राची परिस्थिती खूपच नाजूक राहिलेली होती. अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. या आकडेवारीमध्ये 11,290 शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपैकी 53 टक्के आत्महत्या या शेतमजूर असलेल्या शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत. शेती क्षेत्रातील घटत्या जमिनी धारणेमुळे शेतमजुरी करण्याचे प्रमाण वाढले असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, आत्महत्या करणाऱ्या 5,207 शेतकऱ्यांमध्ये 4,999 पुरुष तर 208 महिलांचा समावेश आहे. दरम्यान, 2015 पासून शेतकऱ्यांच्या आत्महत्येत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

error: Content is protected !!