‘या’ 12 प्रकारच्या अपघातामध्ये मृत्यू झाल्यास शेतकऱ्यांना मिळणार 2 लाख रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात काही वर्षांपासून सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत आहे. काही वर्षांपासून राज्यात शेतकरी अपघात विमा या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळत होता. मात्र ही योजना योग्यरीत्या विमा कंपनी राबवत नव्हती. यामुळे ही योजना बंद करण्यात आली आहे. त्याऐवजी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना एप्रिलमध्ये सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्याला कधी? आणि कशाप्रकारे घेता येईल ही माहिती या लेखात आम्ही सांगणार आहोत.

राज्यात अनेक वर्षांपासून शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ घेत होते. मात्र विमा कंपन्या योग्यरीत्या काम करत नसल्याने या योजनेत फेरबदल करून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना राज्यभरात लागू करण्यात आली आहे. या योजनेतून बारा प्रकारच्या अपघातग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच एक अवयव निकामी आणि आयुष्यभर अपंगत्व असलेल्या शेतकऱ्याला एक लाखापर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. तसेच दोन अवयव निकामी असणाऱ्या आणि आयुष्यभर अपंगत्व असणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. वय वर्षे १८ ते ७५ वयोगटातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. यासाठी पुढीलप्रमाणे दिलेली माहिती फॉलो करा.

घरबसल्या Hello krushi ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज

शेतकरी मित्रांनो सरकार राबवत असलेल्या योजना या आपल्यासाठी अधिकच महत्वाच्या आहेत. या योजनांमुळे शेती व्यवसायात शेतकऱ्यांना फुल ना फुलाची पाकळी मदत होते. यासाठी या योजनेचा लाभ घेण्यासाठी Hello krushi हे ॲप डाऊनलोड करा आणि सरकारी योजनांना एका क्लीकवर अर्ज करून आर्थिक लाभ मिळवा. विशेष म्हणजे यासाठी तुम्हांला १ रुपयाही खर्च करावा लागत नाही. हॅलो कृषीवर याव्यतिरिक्त सातबारा उतारा, रोजचा बाजारभाव, जमीन मोजणी, कृषीविषयक सल्ले यांसारख्या अनेक सुविधा अगदी मोफत मिळत आहेत. त्यासाठी आजच गूगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello krushi डाउनलोड करा.

‘हे’ बारा अपघात शेतकऱ्यांना देतील योजनेचा लाभ

विमा संरक्षणात रस्ता किंवा रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश व विंचुदंश, नक्षलवाद्याकडून झालेल्या हत्या, हिस्त्र जनावरांनी खाल्ल्यामुळे किंवा चावल्यामळे जखमी होणे किंवा मृत्यू, दंगल आणि अन्य कोणतेही अपघातांचा समावेश करण्यात आला आहे.

तर ‘या’ योजनेचा लाभ मिळणार नाही

नैसर्गिक मृत्यू, विमा कालावधीपूर्वीचे अपंगत्व, आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वत:ला जखमी करून घेणे, गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात, अंमली पदार्थांच्या अंमलाखाली असताना झालेला अपघात, भ्रमिष्टपणा, बाळंतपणातील मृत्यू, शरीरांतर्गत रक्तस्त्राव, मोटार शर्यतीतील अपघात, युद्ध, सैन्यातील नोकरी, जवळच्या लाभधारकाकडून खून या बाबींचा विमा संरक्षणात समावेश करता येणार नाही.

ऑफलाईन पद्धतीने देखील मिळवता येणार योजनेचा लाभ

संबंधित तालुक्याच्या कृषीअधिकाऱ्याकडे मृत शेतकऱ्याच्या ३० दिवसांपूर्वी हा अर्ज करावा. मृत शेतकऱ्याचे नाव, ठिकाणी, मृत्यूची नोंद, नातेसंबंध ही सर्व माहिती साध्या कागदावर लिहून घ्यावी. यावर महसूल विभाग आणि पोलीस कर्मचारी येऊन पाहणी करतील. त्यानंतर तो अर्ज तहसीलदार अधिकाऱ्यांपर्यंत जाईल. यावर तहसीलदार या योजनेचा लाभ द्यायचा की नाही हे ठरवतील.

error: Content is protected !!