Farming Techniques : पिकांसाठी पाण्याची गोळी, दुष्काळाची कटकट मिटणार; हेक्टरी 4 किलोची गरज!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : वातावरणातील बदलामुळे शेती करणे काहीसे (Farming Techniques) अवघड जात आहे. मागील वर्षी सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने, खरिपातील पिकांना मोठा फटका बसला. ज्यामुळे अनेक पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली. मात्र आता शेतीमध्ये अशी परिस्थिती उद्भवल्यास हाइड्रोजेल नावाची गोळी शेतकऱ्यांसाठी मदतगार ठरणार आहे. कमी पावसाळाच नाही तर इतर वेळी देखील पिकांना पाणी देताना, मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होते. त्यामुळे शेती क्षेत्रातील पाण्याची अपव्यव थांबवण्यासाठी आणि दुष्काळी परिस्थितीशी (Farming Techniques) सामना करण्यासाठी संशोधकांकडून निरंतर काम केले जात आहे.

कसे काम हाइड्रोजेल? (Farming Techniques Hydrogel Use In Agriculture Sector)

हाइड्रोजेल हे पिकांच्या किंवा झाडांच्या चारही बाजूंना पाणी साठवण्याचे काम करते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये किंवा मग केव्हाही पाऊस झाल्यानंतर हाइड्रोजेल हे मूळ आकारमानाच्या सुमारे 200 ते 800 पट अधिक पाणी धरून ठेवते. ज्यामुळे हाइड्रोजेल वापरामुळे फळ पिकांची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. अर्थात उंट ज्याप्रमाणे एकदा पाणी पिऊन सहा महिन्याचे पाणी साठवून ठेऊ शकतो. अगदी त्याच पद्धतीने हाइड्रोजेल हे पाणी साठवून नंतर पिकांना वापरण्यास मदत करणार आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना हाइड्रोजेलची हेक्टरी 4 किलो इतकी गरज असणार आहे.

काय फायदा होणार?

हाइड्रोजेलच्या वापरामुळे शेतकऱ्यांचा सिंचनादरम्यान पाण्याचा अपव्यय (Farming Techniques) थांबणार आहे. शेती करताना दुष्काळाचा प्रभाव कमी होणार आहे. खतांची कार्यक्षमता वाढवणे या उद्देशाने या हाइड्रोजेलच्या वापराच्या संशोधनास मान्यता देण्यात आली आहे. राष्ट्रीय हिमालयीन मिशनअंतर्गत त्रिपुराच्या केंद्रीय विद्यापीठाने हा प्रोजेक्ट सुरु केला आहे. विद्यापीठाच्या केमिकल आणि पॉलिमर इंजिनीअरिंग विभागाचे डॉ.सचिन भालाधरे यांच्या नेतृत्वाखालील शास्त्रज्ञांना हायड्रोजेल बनवण्यात यश आले होते. शास्त्रज्ञांच्या संशोधनात त्यांना असे आढळून आले की, हायड्रोजेलद्वारे विहित प्रमाणात पाण्याचे वितरण केल्याने जमिनीतील पाण्याची पातळी 50 ते 70 टक्क्यांपर्यंत टिकून राहते.

उत्पादन वाढण्यास मदत होईल

हायड्रोजेल हा देखील एक प्रकारचा पॉलिमर आहे. जो साखळीसारखा असून, त्यात पाणी जमा होते. आणि तो हळूहळू पाणी सोडतो. यामध्ये बाष्पीभवनाची प्रक्रिया होत नाही. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, हायड्रोजेलमुळे पिकांच्या मुळांशी सतत पाणी असल्यास शेतीतील उत्पादन तर वाढतेच शिवाय फुले आणि फळांचा गुणवत्ताही वाढण्यास मदत होईल. त्याचबरोबर दुष्काळापासून शेती पिकांचे संरक्षण होईल. तसेच पिकांना हवामान बदलाच्या परिणामांचा सामना करण्यास मदत होईल.

एक वर्षांपर्यंत असतो प्रभाव

संशोधकांच्या मते, सेल्युलोजपासून बनलेले हायड्रोजेल (Farming Techniques) सूर्यप्रकाशात नष्ट होतात. त्यामुळे त्यांच्यापासून पर्यावरणाचे कोणतेही प्रदूषण होत नाही. ते सहजपणे पाणी शोषून घेतात आणि पुन्हा पाणी सोडतात. तसेच हे हायड्रोजेल 35 ते 40 अंश सेल्सिअस तापमानात प्रभावी प्रभावीपणे काम करतात. हायड्रोजेलची पाण्याने भरण्याची किंवा फुगण्याची क्षमता त्याच्या कोरड्या वजनापेक्षा 400 पट अधिक आहे. त्यामुळे तितक्या क्षमतेने तो पुन्हा पाणी सोडू शकतो. विशेष म्हणजे केवळ एक ते चार किलो हायड्रोजेलने एक हेक्टर जमिनीवरील पिकांना पाणी देणे शक्य होणार आहे. या हायड्रोजेलच्या गोळ्या जमिनीत आठ महिने ते एक वर्षांपर्यंत प्रभावी ठरू शकतात. त्यामुळे शेतीसाठीच्या सिंचनाच्या पाण्याची 60 टक्के बचत होण्यास मदत होणार आहे.

error: Content is protected !!