Farmpower Rotavator : फार्मपॉवर रोटाव्हेटर, सर्वात मजबूत आणि टिकाऊ; वाचा…किंमत?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना शेतीमध्ये अनेक यंत्रसामग्रीची (Farmpower Rotavator) मोठ्या प्रमाणात गरज पडते. सध्या ट्रॅक्टरचा उपयोग अधिक प्रमाणात वाढला आहे. साहजिकच ट्रॅक्टरचलित साधनांची गरज देखील तितक्याच क्षमतेने वाढली आहे. शेतकऱ्यांना शेतीमध्ये रोटाव्हेटर या यंत्राची नेहमीच गरज भासते. मात्र कडक जमिनीमध्ये वापर करताना शेतकऱ्यांना मजबूत आणि टिकाऊ अशा रोटाव्हेटरची गरज असते. याच पार्श्वभूमीवर आज आपण ‘फार्मपॉवर एक्सट्रा दम रोटाव्हेटर’ (Farmpower Rotavator) या मजबूत आणि टिकाऊ रोटाव्हेटरबद्दल अधिक जाणून घेणार आहोत.

काय आहेत विशेषतः? (Farmpower Rotavator For Farmers)

  • ‘फार्मपॉवर एक्सट्रा दम रोटाव्हेटर’ (Farmpower Rotavator) हा सर्व प्रकारच्या मातीमध्ये वापरला जाऊ शकतो.
  • कंपनीने या रोटाव्हेटरला 36, 42, 48 आणि 54 पाती मॉडेलमध्ये तयार केले आहे.
  • या रोटाव्हेटरसाठी शेतकऱ्यांकडे 35 ते 65 एचपीचा ट्रॅक्टर असणे आवश्यक असते.
  • हा रोटाव्हेटर डबल स्पीड गिअरच्या गिअरबॉक्ससह येतो.
  • या रोटाव्हेटरमध्ये तुम्हाला पिरॅमिड टाईप थ्री पॉइंट लिकेंज पाहायला मिळतात.
  • ‘फार्मपॉवर एक्सट्रा दम रोटाव्हेटर’ हा 1485/1730/1975/ 2220 एमएम लांबी, 1815/2095/2320/2550 एमएम रुंदी आणि 1035 एमएम उंचीसह तयार करण्यात आला आहे.
  • हा रोटाव्हेटर जमीन तयार करताना आधीच्या पिकाचे सर्व अवशेष मुळापासून नष्ट करतो.
  • या रोटाव्हेटरमुळे शेतकऱ्यांना कमी वेळात पेरणीसाठी जमीन तयार करता येते.
  • ‘फार्मपॉवर एक्सट्रा दम रोटाव्हेटर’ची विशेषतः म्हणजे तो जपानी तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार करण्यात आला आहे.

काय आहेत फीचर्स?

‘फार्मपॉवर एक्सट्रा दम रोटाव्हेटर’ हा शेतकऱ्यांसाठी अधिक टिकाऊ, मजबूत आणि किफायती रोटाव्हेटर आहे. कंपनीने आपल्या या रोटाव्हेटरला हेवी ड्यूटी डिजाइनमध्ये तयार केलेले आहे. या रोटाव्हेटरला मल्टीस्पीड हेवी ड्यूटी गिअर बॉक्स देण्यात आला आहे. जो कडक, काळपोटी चिगट माती, तसेच मुरमाड मातीमध्ये देखील योग्यरित्या काम करतो. अर्थात कंपनीच्या या रोटाव्हेटरचा उपयोग सर्व प्रकारच्या मातीमध्ये केला जाऊ शकतो. या रोटाव्हेटरला मोठ्या आकाराचा हिच ब्रॅकेट आणि मजबूत हिच पिरॅमिड देण्यात आला आहे. ज्यामुळे तो सर्व प्रकारच्या ट्रॅक्टरच्या मदतीने अगदी सहजपणे संचालित केला जाऊ शकतो.

किती आहे किंमत?

कंपनीने आपल्या ‘फार्मपॉवर एक्सट्रा दम रोटाव्हेटर’ची किंमत 1.20 लाख रुपये इतकी निश्चित केलेली आहे. अर्थात यात साईज आणि पाती यानुसार दरात बदल होत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. याशिवाय तुम्हाला 6 फुटी रोटाव्हेटर हवा असेल तर त्यासाठी तुमच्याकडे 40 एचपी ट्रॅक्टर असणे आवश्यक ठरते, तर 7 फुटी रोटाव्हेटर हवा असेल तर त्यासाठी तुमच्याकडे 48 एचपी आणि 8 फुटी रोटाव्हेटर हवा असेल तर त्यासाठी तुमच्याकडे 54 एचपी ट्रॅक्टर असणे आवश्यक असते.

error: Content is protected !!