Farmtrac Tractor : ‘फार्मट्रॅक ऍटम’ शेतकऱ्यांसाठीचा अत्याधुनिक छोटा ट्रॅक्टर; वाचा किंमत?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : फार्मट्रॅक ही ट्रॅक्टरसह (Farmtrac Tractor) कृषी उपकरणे निर्मिती करणारी देशातील आघाडीची कंपनी आहे. कंपनीची बाजारात सध्या ट्रॅक्टर, हार्वेस्टर, बायो-डिझेल ट्रॅक्टर आणि अन्य कृषी उपकरणे उपलब्ध आहेत. सध्याच्या घडीला अनेक ट्रॅक्टर उत्पादक कंपन्या आपल्या ट्रॅक्टर्सला अत्याधुनिक मोडमध्ये सादर करत आहे. फार्मट्रॅक कंपनीने देखील आपला ‘फार्मट्रॅक ऍटम 30’ हा अत्याधुनिक ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी बनवला आहे. विशेष म्हणजे हा ट्रॅक्टर छोटा असून, तो 1000 किलोपर्यंत वजन उचलू शकतो. त्यामुळे आता तुम्हीही तुमच्या शेतीसाठी एखादा छोटा ट्रॅक्टर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ‘फार्मट्रॅक ऍटम 30’ (Farmtrac Tractor) हा छोटा ट्रॅक्टर तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरणार आहे.

‘फार्मट्रॅक ऍटम 30’ ट्रॅक्टरबद्दल (Farmtrac Tractor Atom 30 For Farmers)

फार्मट्रॅक कंपनीचा ‘फार्मट्रॅक ऍटम 30’ हा छोटा ट्रॅक्टर तुम्हाला 3 सिलेंडरमध्ये उपलब्ध आहे. ज्याला लिक्विड कुलिंग सिस्टिम देण्यात आली आहे. हा ट्रॅक्टर 30 एचपीचा असून, तो 80.5 एनएम टॉर्क जनरेट करतो. कंपनीने आपल्या या छोट्या ट्रॅक्टरला सर्वोत्तम क्वालिटीचा एयर फिल्टर दिलेला आहे. जो इंजिनचे धूळ, माती यापासून संरक्षण करतो. कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला 1000 किलोग्रॅम वजन उचलण्याची क्षमता दिलेली आहे. ज्यामुळे शेतकरी एकाच वेळी मोठ्या प्रमाणात शेतमालाची वाहतूक करू शकतात. कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरची निर्मिती 1550 एमएम व्हीलबेसमध्ये केलेली आहे. याशिवाय कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला 310 एमएम इतका ग्राउंड क्लीयरन्स दिलेला आहे.

काय आहेत फीचर्स?

  • फार्मट्रॅक कंपनीने आपल्या ‘फार्मट्रॅक ऍटम 30’ या छोट्या ट्रॅक्टरला (Farmtrac Tractor) बॅलन्सड पॉवर स्टीयरिंग दिलेली आहे.
  • बॅलन्सड पॉवर स्टीयरिंगमुळे चालकाला खडबडीत रस्त्यावरून ट्रॅक्टर चालवताना देखील आरामदायी अनुभव मिळतो.
  • या ट्रॅक्टरला कंपनीने पुढील बाजूस 9 आणि मागील बाजूस 3 गिअरसह गिअरबॉक्स दिलेला आहे.
  • फार्मट्रॅक कंपनीचा हा ट्रॅक्टर साईड शिफ्ट टाइप ट्रांसमिशनसह येतो.
  • कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला ऑइल इमर्जड ब्रेक्स दिलेले आहे. ज्यामुळे उतारावर देखील ट्रॅक्टरवर चटकन नियंत्रण मिळवता येते.
  • हा छोटा ट्रॅक्टर ड्युअल पीटीओ टाइप पॉवर टेकऑफसह येतो. जो 540/540E आरपीएम निर्मिती करतो.
  • फार्मट्रॅक कंपनीने आपल्या ‘फार्मट्रॅक ऍटम 30’ या छोट्या ट्रॅक्टरला पुढील बाजूस 6.00×12 आकारात तर मागील बाजूस 8.30×20 आकारात टायर दिलेले आहे.

किती आहे किंमत?

फार्मट्रॅक कंपनीने आपल्या ‘फार्मट्रॅक ऍटम 30’ या छोट्या ट्रॅक्टरची किंमत भारतीय शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन, निश्चित केली आहे. कंपनीने आपल्या या छोट्या ट्रॅक्टरची शोरूम किंमत 6.50 लाख रुपये इतकी ठेवली आहे. देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये आरटीओ रजिस्ट्रेशन आणि रोड टॅक्स यामुळे ऑन रोड किमतीमध्ये वेगवेगळया भागात बदल असू शकतो.

error: Content is protected !!