Farmtrac Tractor : शेतकऱ्यासांठी फार्मट्रॅक कंपनीचा महाबली ट्रॅक्टर; वाचा किंमत, वैशिष्ट्ये!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील फार्मट्रॅक कंपनी (Farmtrac Tractor) ही कृषी उपकरणे निर्मिती करणारी आघाडीची कंपनी असून, ती दमदार ट्रॅक्टर निर्माण करण्यासाठी ओळखली जाते. त्यामुळे तुमचा देखील ट्रॅक्टर खरेदीचा विचार असेल तर तुम्ही फार्मट्रॅक कंपनीचा Farmtrac 6080 X Pro हा ट्रॅक्टर खरेदी करून आपल्या शेतीमध्ये भरभराट आणू शकतात. याच पार्श्वभूमीवर आज आपण फार्मट्रॅक कंपनीच्या Farmtrac 6080 X Pro या ट्रॅक्टरबद्दल (Farmtrac Tractor) सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

“फार्मट्रॅक 6080 एक्स प्रो”ट्रॅक्टरबद्दल (Farmtrac Tractor For Farmers)

“फार्मट्रॅक 6080 एक्स प्रो” हा ट्रॅक्टर (Farmtrac Tractor) 4 सिलेंडरसोबतच कुलिंग सिस्टिम इंजिनसह येतो. हा ट्रॅक्टर प्रामुख्याने 80 HP पॉवर जनरेट करतो. तसेच तो शेतातील सर्व कठीण काम आणि व्यावसायिक वापरासाठी देखील वापरला जाऊ शकतो. फार्मट्रॅक कंपनीच्या या ट्रॅक्टरला थ्री स्टेज वेट एअर क्लिनर देण्यात आला आहे. जो मशीनचे धूळ, मातीपासून संरक्षण करतो. ज्यामुळे इंजिनचे आयुष्य वाढण्यासाठी मदत होते. या पॉवरफुल ट्रॅक्टरचा कमीत कमी पीटीओ पॉवर ही 68 HP इतकी असून, ज्याद्वारे हा ट्रॅक्टर शेतातील कामे अगदी सहजपणे करतो. कंपनीच्या या ट्रॅक्टरचे इंजिन 2200 आरपीएमची निर्मिती करते. या ट्रॅक्टरला कंपनीने 4190 MM लांबी आणि 1940 MM रूंदीसह 2300 MM व्हीलबेसमध्ये तयार केलेले आहे. या शक्तिशाली ट्रॅक्टरचे एकूण वजन 3580 किलोग्रॅम असून, तो 4WD ड्राइवसह येतो.

“फार्मट्रॅक 6080 एक्स प्रो”ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये

 • या ट्रॅक्टरला कंपनीने पॉवर स्टीयरिंग दिलेली आहे.
 • या ट्रॅक्टरला पुढील बाजूस 12 आणि मागील बाजूस 12 गिअर देण्यात आले आहे.
 • या ट्रॅक्टरची वजन उचलण्याची क्षमता ही 2500 किलोग्रॅम इतकी आहे.
 • कंपनीने या ट्रॅक्टरला पुढील बाजूस 1.56 ते 32.35 kmph इतका वेग तर मागील बाजूस 1.34 ते 27.49 kmph इतका वेग दिलेला आहे.
 • कंपनीने या ट्रॅक्टरला स्वतंत्र क्लच दिलेला आहे.
 • या ट्रॅक्टरच्या डिझेल टाकीची क्षमता 70 लीटर इतकी आहे.
 • फार्मट्रॅक 6080 एक्स प्रो ट्रॅक्टरला कंपनीने 2300 MM चा व्हीलबेस दिलेला आहे.
 • याशिवाय पुढील बाजूस 12.4 x 24 आकाराचे आणि मागील बाजूस 18.4 x 30 आकाराचे टायर देण्यात आले आहे.
 • हा ट्रॅक्टर 540 आणि 540 E PTO टेकऑफ पॉवरसह येतो.
 • कंपनीने या ट्रॅक्टरला मल्टी प्लेट ऑइल इमर्जड डिस्क ब्रेक दिलेला आहे.
 • याशिवाय या ट्रॅक्टरचा ग्राउंड क्लिअरन्स हा 410 MM इतका आहे.

किती आहे किंमत?

फार्मट्रॅक कंपनीने “फार्मट्रॅक 6080 एक्स प्रो” या ट्रॅक्टरची शोरूम किंमत 13.38 लाख ते 13.70 लाख रुपये इतकी निर्धारित केलेली आहे. ज्यामुळे देशातील वेगवेगळ्या भागात या ट्रॅक्टरची ऑन रोड प्राईस वेगवेगळी असू शकते. इतकेच नाही तर कंपनीने या ट्रॅक्टरला 5 वर्षांची वारंटी देखील दिलेली आहे. त्यामुळे तुमच्यासाठी हा ट्रॅक्टर किफायतशीर ठरू शकतो.

error: Content is protected !!