महाराष्ट्राच्या काही भागांत तापमान 10°c पेक्षा कमी राहणार; फेब्रुवारीत अनुभवायला मिळणार गुलाबी थंडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | राज्यात सर्वत्र थंडिचा कडाका वाढला असून आता पुढील काही दिवसांत तापमान 10° c पेक्षा कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यात फेब्रुवारीच्या पहील्या आठवड्यानंतर, परत एकदा थंडीचा स्पेल येण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली आहे.

पुढील ३-४ दिवस उत्तर मध्य महाराष्ट्र, संलग्न मराठवाडा,कोकण, मुंबईसह, मध्ये तापमानात विषेश घट दिसू शकते. तसेच काही ठिकाणी मध्य महाराष्ट्रात एक आकडी तापमानाची पण शक्यता आहे असं हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

तसेच मध्य महाराष्ट्र आणी जवळील शहरात सुद्धा खूप कमी तापमान दर्शवत आहे. दरम्यान थंडीचा हा स्पेल वाढल्याने उन्हाळा मात्र लांबणीवर पडणार आहे. ग्रामिण भागात यामुळे सकाळी धुके पडत असून शहरांमध्ये गुलाबी थंडी पहायला मिळत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!