शेतकऱ्यांनो, आता थेट Whatsapp वरून करा खतासंबंधित तक्रार; मंत्री मुंडेंचा मोठा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । सध्या महाराष्ट्र्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असून बोगस खत आणि बियाणे विक्रीच्या मुद्याविरोधात विरोधक आक्रमक झाले आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना खत खरेदीमध्ये मोठा तोटा सहन करावा लागतो. खत विक्रेते शेतकऱ्यांवर सक्ती दाखवून त्यांना विशिष्ट कंपनीचे खत घेण्यास भाग पाडतात. अशा कंपन्या सहज शेतकऱ्यांची फसवणूक करून जातात. मात्र जास्त काही माहिती नसल्यामुळे तसेच गरजेपोटी शेतकरी अशा प्रकारच्या खतांची खरेदी करतात. त्यामुळे ब्रँडच्या नावावर कनिष्ठ खतांची विक्री करणाऱ्या कंपन्यांवर आळा बसवण्यासाठी काहीतरी उपाय योजना करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती. याच पार्श्वभूमीवर नननिवार्चित कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी खत विक्रेत्यांविरुद्ध शेतकऱ्यांना तक्रार करण्यासाठी तात्काळ व्हॉट्सॲप नंबर सुरु करण्याचे निर्देश धनंजय मुंडे यांनी कृषी विभागाला दिले आहेत

हा तात्काळ तक्रार दाखल नंबर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात यावा असे आदेश देखील धनंजय मुंडे यांनी विभागाला दिले आहेत. या व्हाट्सअप नंबरमुळे शेतकरी त्वरित आपली तक्रार कृषी विभागापर्यंत पोहोचवू शकतात. शेतकरी आपली होणारी फसवणूक तसेच खत विक्रीमध्ये करण्यात आलेले फेरबदल या सर्व तक्रारी व्हाट्सअप नंबरच्या माध्यमातून कृषी विभागाकडे नोंदवू शकतात. मंगळवारी धनंजय मुंडे यांची मंत्रालयात कृषी विभागातील मुख्याधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. यावेळी त्यांनी कृषी निविष्ठा व गुण नियंत्रण तसेच बियाणे पुरवठ्याबाबत आढावा घेतला. यानंतरच शेतकऱ्यांना तक्रार नोंदवण्यासाठी व्हाट्सअप नंबर सुरू करण्यात यावा असे निर्देश देखील त्यांनी दिले.

शेतकरी मित्रानो, तुम्हाला तुमच्या आसपासची खत दुकाने, कृषी केंद्रे यांचा कॉन्टॅक्ट हवा असेल तर आजच मोबाईल मध्ये Hello Krushi अँप डाउनलोड करा. हॅलो कृषीच्या माध्यमातून कोणत्याही खत दुकानदाराशी संपर्क साधून घरबसल्या खतांची माहिती मिळू शकते. तसेच तुम्हाला कोणत्याही पिकांच्या बियाणाची खरेदी किंवा विक्री करायची असेल तर ती सुद्धा हॅलो कृषीच्या माध्यमातून तुम्ही करू शकता. महत्त्वाचे म्हणजे यासाठी तुम्हाला १ रुपयाही खर्च करावा लागत नाही. याव्यतिरिक्त हॅलो कृषीवर जमीन मोजणी, कृषी सल्ले, सातबारा उतारा, रोजचा बाजारभाव, पशु खरेदी- विक्री यांसारख्या अनेक सुविधा अगदी फुकट मध्ये मिळत आहेत. यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi डाउनलोड करा.

एखादी कंपनी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या खतांमध्ये फसवणूक करत असेल तर त्याची तक्रार देखील ते या ठिकाणी नोंदवू शकतात. शेतकऱ्याने व्हाट्सअप नंबरवर तक्रार दाखल केल्यास त्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल. त्याचबरोबर त्याने नोंदवलेल्या तक्रारीवर लगेच कारवाई करत या सर्व प्रकारावर आळा बसवण्यात येईल. दरम्यान आज उच्च न्यायालयात शेतकऱ्यांनी नोंदवलेल्या कित्येक तक्रारी प्रलंबित आहेत. यातील अनेक प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळालेला नाही. याचबरोबर सरकार देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करताना दिसतात. त्यामुळे या गंभीर बाबीकडे लक्ष देण्यासाठी त्यावर कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.

error: Content is protected !!