Fertilizer For Kharif Season: हिंगोली जिल्ह्याला खरीप हंगामासाठी 85,451 टन रासायनिक खते मंजूर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: यंदाच्या खरीप हंगामासाठी (Fertilizer For Kharif Season) हिंगोली जिल्ह्याला कृषी विभागाने (Agriculture Department) 82 हजार 51 टन खतांची (Fertilizers) मागणी केली होती. या मागणीनुसार कृषी आयुक्तालयाने विविध ग्रेडच्या 85 हजार 451 टन रासायनिक खते (Fertilizer For Kharif Season) मंजूर केली आहेत.

विशेष म्हणजे मंजूर केलेल्या खतामध्ये नॅनो युरियाच्या (Nano Urea) 17 हजार 600 व नॅनो डीएपी 2 हजार बॉटल्सचा समावेश आहे.

दरवर्षी खरीप अगोदर शेतकर्‍यांची (Farmers) खते आणि औषधे खरेदीसाठी धावपळ सुरू होते. वेळेवर पिकांसाठी खते न मिळाल्यामुळे शेतकर्‍यांची निराशा होते व त्यामुळे पिकांचे सुद्धा नुकसान होते. परंतु या वेळेस हिंगोली जिल्ह्यासाठी (Hingoli District) मागणीपेक्षा जास्त खते मंजूर झाल्यामुळे शेतकर्‍यांसाठी ही आनंदाची बाब आहे. यावेळी खतांची टंचाई (Fertilizer Shortage) जाणवणार नाही असे दिसते.  

मंजूर खतांचे तपशील (Fertilizer For Kharif Season)

• एकूण मंजूर खत: 85 हजार 451 टन

• मागणी केलेले खत: 82 हजार 51 टन

• यंदाच्या मागणीपेक्षा जास्त: 3 हजार 400 टन

• गतवर्षीच्या तुलनेत जास्त: 7 हजार 891 टन

• जिल्ह्यात प्रस्तावित पेरणी: 3 लाख 11 हजार 404 हेक्टर

• जिल्ह्याचा सरासरी खत वापर: 81 हजार 569 टन

मंजूर खतांचे प्रकार आणि प्रमाण (Fertilizer For Kharif Season)

• युरिया: 16 हजार 200 टन

• डिएपी: 15 हजार 800 टन

• पोटॅश-एमओपी: 3 हजार 300 टन

• सुपर फॉस्फेट: 16 हजार 101 टन

• अमोनियम सल्फेट: 50 टन

• संयुक्त खते (एनपीके): 34 हजार टन

खताचा पुरवठा (Fertilizer For Kharif Season)

• एप्रिल महिन्यासाठी मंजूर खत: 5 हजार 99 टन

• आतापर्यंत पुरवठा केलेला खत: 2 हजार 590 टन

• मार्च अखेरीस शिल्लक असलेले खत: 31 हजार 146 टन

हिंगोली जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च अखेरीस शिल्लक असलेल्या खताचा पुरवठा आणि एप्रिल मधील पुरवठा मिळून एकूण 33 हजार 736 टन खताचा साठा (Fertilizer Stock) शिल्लक आहे.

error: Content is protected !!