Fertilizer Management : शेतातील गवत नष्ट करण्यासाठी घरच्याघरी बनवा तणनाशक, कमी पैशांत बेस्ट रिझल्ट; पहा कसं तयार करायचं?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Fertilizer Management : सध्या शेतीला खर्च जास्त होत असल्याने शेती परवडत नाही असे अनेक जणांचे म्हणणे आहे. शेतीतील औषध फवारणी असेल किंवा अन्य काही गोष्टींवर खर्च असेल हा जास्त होतो. त्यामुळे शेती करण्यास परवडत नाही असे अनेक जणांचे म्हणणे आहे. यामध्ये शेतकऱ्यांची सर्वात मोठी डोके दुखी म्हणजे शेतातील तण बऱ्याचदा शेतामध्ये औषध फवारणी करून देखील तण मरत नाही त्यामुळे शेतकरी सतत चिंतेत असतात मात्र. आम्ही सध्या तुम्हाला एक असं तणनाशक सांगणार आहोत जे तुम्ही घरच्या घरी तयार करून शेतातील तण मारू शकता. (Agriculture News)

सर्वात कमी किंमतीत खत, औषधे कुठे मिळतील?

शेतकरी मित्रांनो आता तुम्हीसुद्धा अतिशय कमी किंमतीत खते, औषधे तसेच शेती उपकरणे विकत घेऊ शकता. यासाठी तुम्हाला शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी तयार केलेले Hello Krushi नावाचे अँप तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करून घ्यावे लागेल. या अँपवर तुम्हाला रोजचे बाजारभाव, जमीन मोजणी, सातबारा डाउनलोड करणे, हवामान अंदाज आदी सेवा मोफत दिल्या जातात. तेव्हा आजच गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi डाउनलोड करून घ्या.

मीठ आणि युरियाचे जालीम तणनाशक

शेतकरी शेतामध्ये अनेक वेगवेगळी औषधे फवारत असतात. मात्र तरी देखील त्यांच्या शेतातील गवत नष्ट होत नाही. मात्र मीठ आणि युरियाचे जालीम तणनाशक बनवले तर तुमच्या शेतातील तण झटपट जळू शकत. त्याचबरोबर तुमचा औषध खरेदी करण्याचा खर्च देखील खूप वाचत आहे. हे तणनाशक तुम्ही अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवू शकता

कसं बनवायचं हे तणनाशक?

आता तुमच्याकडे जर 15 लिटरचा फवारणी पंप असेल तर त्यामध्ये तुम्हाला ३०० ग्रॅम मीठ टाकायचे आहे. हे खडा मीठ म्हणजेच जाड मीठ तुम्हाला या ठिकाणी घ्यायचे आहे. त्याचबरोबर यामध्ये मूठभर युरिया देखील घ्यायचा आहे. थोडक्यात दीडशे ग्रॅम युरिया घ्यायचा हे आपण मिश्रण बनवणार आहोत ते मिश्रण पंधरा लिटर पंपासाठी आहे. हे मित्रां तयार झाल्यानंतर तुम्ही त्याची फवारणी करू शकता. अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्येच हे मिश्रण तयार होत आहे. त्यामुळे तुमचा वेळ देखील यासाठी जास्त जात नाही.

याची फवारणी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?

  • तुम्ही जर कोणत्याही पिकावर हे औषध मारत असाल तर आपलं जे पीक आहे त्यावरही औषध गेलं नाही पाहिजे याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे अन्यथा तुमच्या पिकाला याची इजा होऊ शकते
  • शक्यतो पेरणी आधीच याचा उपयोग करावा
  • आधी बांधावरच्या तणावर याचा प्रयोग करून बघा
  • यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त आणि फक्त खडा मीठ वापरा
error: Content is protected !!