Fertilizer Rate: रासायनिक खताच्या किमतीत 50 रूपयांची वाढ!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: मागील काही वर्षात खताच्या किमतीत (Fertilizer Rate) 35 ते 40 टक्के वाढ झाली.आतापरत एकदा खरीप हंगामापूर्वीच रासायनिक खताच्या किमतीत 50 रूपयांची वाढ झाल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. गेल्या दोन-चार वर्षांपासून रासायनिक खतांची दरवाढ (Chemical Fertilizer Price Increase) यामुळे शेतकर्‍यांना खतावर अधिक खर्च (Fertilizer Rate) करावे लागत आहे. त्यामुळे उत्पादन खर्च वाढून त्यांचे आर्थिक चक्र बिघडत आहे.  

सध्या शेतकरी खरीप पूर्व मशागतीच्या (Land Preparation) कामात गुंतले आहेत. खरीप पेरणी (Kharif Sowing) सुरू झाल्यास खताचे भाव (Fertilizer Rate) वाढू शकतात किंवा तुटवडा निर्माण होऊ शकतो या भीतीने शेतकरी येणाऱ्या खरीप हंगामासाठी रासायनिक खतांची आतापासूनच साठवणूक करायला सुरुवात करतात. अनेकदा पेरणी झाल्यावर खत वेळेवर उपलब्ध नसल्यामुळे शेतकर्‍यांना मनस्तापाला सामोरा जावे लागते. जूनच्या पहिल्या आठवड्यातच मोसंबी बागा आणि ऊस पि‍कासाठी खतांची पुरेशी मात्रा देणे आवश्यक असते, त्यामुळे रासायनिक खतांची (Chemical Fertilizer) मागणी आतापासूनच वाढली आहे.

रासायनिक खताच्या दरात झालेली वाढ खालील प्रमाणे आहे

युरिया प्रति बॅग: 266 रुपये

डीएपी प्रति बॅग: 1350 रुपये

महाधन 2424 प्रति बॅग: 1700 रुपये

सुफला 15:15:15 प्रति बॅग: 1475 रुपये

हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, मागील खरीप हंगामापूर्वीही 50 रूपयांची वाढ झाली होती. दोन महिन्यांपूर्वी हेच रासायनिक खत 50 रुपये कमी किमतीने विक्री होत होते.

खताच्या किमतीत (Fertilizer Rate) सतत होत असलेली वाढ शेतकर्‍यांसाठी चिंतेचा विषय आहे. कारण खर्च तर वाढतो परंतु उत्पन्न पाहिजे त्याप्रमाणे मिळेलच याची शाश्वती  नसते.  त्यामुळे सध्यातरी  शेतकर्‍यांवर खर्चाचा बोजा वाढतच चाललेला आहे असेच म्हणता येईल.

error: Content is protected !!