Fertilizer Subsidy : ‘या’ योजनेअंतर्गत खतांसाठी मिळणार 100 टक्के अनुदान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Fertilizer Subsidy : राज्य सरकारनं भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत आता खतांसाठी देखील १०० % अनुदान देण्यात येईल, अशी घोषणा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंतिनिमित्त मुंडे यांनी ही घोषणा केली. या योजने अंतर्गत १५ फळपिकांचा समावेश करण्यात आला असून खड्डे खोदणं, ठिबक सिंचन यांसारख्या कामांना शंभर टक्के अनुदान देण्यात येते.

त्याचबरोबर आता या योजनेतून आवश्यक खतांसाठीही १०० टक्के अनुदान दिले जाईल. फळबाग लागवड अंतर्गत ठिबक सिंचन करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून अनुदान देण्यात येते, त्यामुळे आता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून ठिबक ऐवजी सर्व प्रकारच्या आवश्यक खतांसाठी शंभर टक्के अनुदान देण्यात येणार येईल.

यासाठी अर्थसंकल्पात १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून आवश्यकता भासल्यास शंभर कोटींच्या तरतुदीमध्ये आणखी वाढ करण्यात येईल असंही मुंडे यांनी सांगितलं. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहसुद्धा मुंडे यांनी केले आहे.

error: Content is protected !!