Fertilizer Subsidy : रब्बी हंगामासाठी 22 हजार 303 कोटींच्या खत अनुदान निधीस मंजूरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : चालू रब्बी हंगामात गहू ,मोहरी, हरभरा, मसूर या पिकांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत चालू रब्बी हंगामासाठी फॉस्फेट आणि पोटॅशशयुक्त खतांसाठी 22 हजार 303 कोटी रुपयांच्या अनुदान (Fertilizer Subsidy) निधीस मंजुरी देण्यात आली आहे. मात्र असे असले तरी DAP खताची गोणी ही 1350 रुपये दरानेच उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर याबाबत बोलताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात वाढत असलेल्या खतांच्या किमतींचा (Fertilizer Subsidy) प्रभाव देशातील शेतकऱ्यांवर पडणार नाही यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

DAP खते जुन्या किमतीत मिळणार – Fertilizer Subsidy

दरम्यान, २०२३-२४ च्या रब्बी हंगामात नायट्रोजन खतासाठी 47.2 रुपये प्रति किलो, फॉस्फरससाठी 20.42 रुपये प्रति किलो, पोटॅशसाठी 2.38 रुपये प्रति किलो तर सल्फरसाठी 1.89 रुपये प्रति किलो इतके अनुदान प्रदान करण्यात येणार आहे. याच अनुषंगाने झालेल्या केंद्र सरकारच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत या 22 हजार 303 कोटी रुपयांच्या अनुदान निधीस मंजुरी देण्यात आली आहे. मात्र असे असले तरीही डाय-अमोनियम फॉस्फेटची (DAP ) गोणी ही जुन्या किमतीतच उपलब्ध होणार असून, तिचा 1350 रुपये प्रति गोणी हा दर कायम असणार आहे. तर नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम अर्थात एनपीकेची गोणी ही 1470 रुपये प्रति गोणी या दराने उपलब्ध असणार आहे.

error: Content is protected !!