Fertilizer Subsidy : येत्या खरीप हंगामात खत अनुदानासाठी 24,420 कोटींचा निधी मंजूर; केंद्राचा निर्णय!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने येत्या खरीप हंगामासाठी रासायनिक खतांच्या अनुदानात (Fertilizer Subsidy) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने 2024 च्या खरीप हंगामात देशभरात शेतकऱ्यांना खत अनुदानापोटी 24,420 कोटी रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता.29) झालेल्या केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना योग्य त्या प्रमाणात आणि वेळेवर खते (Fertilizer Subsidy) उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत, फॉस्फेटिक आणि पोटॅशयुक्त खतांसाठी (Fertilizer Subsidy) 1 एप्रिल 2024 ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीसाठी हा 24,420 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सर्व खते उत्पादक कंपन्यांना अनुमोदित आणि आणि अधिसूचित दरांनुसार ही सबसिडी दिली जाणार आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना स्वस्तात आणि कमी किमतीमध्ये खते उपलब्ध होतील. संबंधित खतांचे चालू वर्षासाठीचे दर निश्चित करण्यास देखील मान्यता यावेळी देण्यात आली आहे. याशिवाय सरकारने या बैठकीत शेतकऱ्यांसाठी चालू वर्षीपासून नव्याने 3 खतांचा समावेश करण्यास देखील मंजुरी दिली आहे.

शेतकऱ्यांना काय फायदा होणार? (Fertilizer Subsidy For Farmers)

  • शेतकऱ्यांना माफक आणि योग्य दरात खते उपलब्ध होण्यास मदत होईल.
  • यावर्षी तीन नवीन खतांना मंजुरी देण्यात आल्यामुळे मातीचा पोत सुधारण्यास मदत होईल.
  • शेतकऱ्यांना मातीच्या गरजेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खते मिळण्यास मदत होईल.
  • सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतींचा आधार घेऊन, पोटॅशिअम आणि कॅल्शिअमयुक्त खतांची योग्य त्या प्रमाणात दर निश्चिती केली जाईल.

खरीप हंगामात सुरवातीलाच शेतकऱ्यांना रासायनिक खतांची मोठ्या प्रमाणात गरज असते. मात्र या खतांची मागणी जास्त असल्याने शेतकऱ्यांना सहजासहजी खताच्या गोण्या मिळत नाही. या समस्येवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने ही देशव्यापी खत अनुदान योजना आखली असून, शेतकऱ्यांना वेळेवर खते मिळावीत. हा रासायनिक खतांना अनुदान देण्याच्या योजनेमागील मुख्य उद्देश आहे.

error: Content is protected !!