Fertilizer Subsidy : यापुढे शेतकऱ्यांना खतांचे अनुदान थेट बँक खात्यावर मिळणार? कंपन्यांचा पत्ता कट!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला देशामध्ये शेतकऱ्यांना खतांवरील अनुदानासाठी (Fertilizer Subsidy) दिली जाणारी रक्कम थेट कंपन्यांना दिली जात होती. मात्र, शेतकऱ्यांऐवजी अनुदानाचा पैसे खत कंपन्यांना देणे. हे देशभरातील शेतकऱ्यांसाठी हिताचे नाही. त्यामुळे आता यापुढे खतांवरील अनुदान रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात दिली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार खतांवरील अनुदानासाठीची रक्कम यापुढे कृषी मंत्रालयाच्या अर्थसंकल्पात सादर केली जाणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे. परिणामी, यापुढे शेतकऱ्यांनी खते खरेदी केल्यानंतर त्यांना थेट अनुदान (Fertilizer Subsidy) बँक खात्यावर जमा होणार असल्याचे बोलले जात आहे.

काय आहे सरकारची योजना? (Fertilizer Subsidy For Farmers)

एका सरकारी अधिकाऱ्याने नामांकित वृत्तसमूहाला दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांसाठी दिल्या खत अनुदान (Fertilizer Subsidy) योजनेत बदल केले जाण्याबाबत सरकारी पातळीवर चर्चा सुरु आहे. केंद्रात पुढील सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या 100 दिवसात ही योजना आणली जाऊ शकते. मात्र, याबाबत सध्या सरकारकडे दोन पर्याय आहेत. एक तर सरकार शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर पैसे जाम करेल किंवा मग शेतकऱ्यांसाठी कुपन (सवलत व्यवस्था) व्यवस्था लागू केली जाईल. असे सांगितले जात आहे.

वितरण व्यवस्थेत बदल करावा लागणार

तसेच केंद्र सरकारकडून याबाबत विचार सुरु झाला असला तरी त्यासाठी थेट शेतकऱ्यांना खत अनुदान द्यायचे झाले तरी सध्याच्या प्रणालीत मोठे बदल करावे लागणार आहे. म्हणजेच सरकारला सर्वात मोठी समस्या अनुदान वितरित करण्याची असणार आहे. सध्याच्या घडीला पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी असलेल्या प्रणाली सारखीच व्यवस्था सरकारला उभारावी लागणार आहे. असेही या अधिकाऱ्याने म्हटले आहे.

कसे मिळणार शेतकऱ्यांना अनुदान?

खत अनुदानावरील रक्कम थेट शेतकऱ्यांना वितरण प्रणाली काहीही असली तरी त्याचा शेतकऱ्यांवर विपरीत परिणाम होणार नाही. शेतकऱ्यांना शेतीच्या हंगामापूर्वी खत अनुदानाचे पैसे दिले जातील. जेणेकरून शेतकऱ्यांना संपूर्ण हंगामात मुबलक प्रमाणात खते मिळून अनुदान देखील शेत शेतकऱ्यांनाच मिळेल. यासाठी कुपन व्यवस्था एकदम परफेक्ट मानली जात आहे. ज्यानुसार शेतकऱ्याला हंगामातील एकूण पिकांच्या गरजेनुसार कुपन दिले जातील. हे कुपन दुकानदाराकडे दिल्यास शेतकऱ्यांना, त्या मागणीनुसार अनुदान व खते मिळतील. तसेच या कूपनच्या आधारे शेतकरी सेंद्रिय खते आणि कीटकनाशके देखील खरेदी करू शकणार आहे. असेही या अधिकाऱ्याने म्हटले आहे.

error: Content is protected !!