Fertilizers Rate : खरिप हंगामासाठी खतांच्या गोण्यांच्या किमती जाहीर; वाचा किती आहेत दर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने गुरुवारी (ता.29) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत रासायनिक खतांच्या (Fertilizers Rate) 24,420 कोटींच्या अनुदानाला मंजुरी दिली. त्यामुळे आता शेतकऱ्यांना आगामी खरीप हंगामात खतांच्या गोण्या मुबलक प्रमाणात मिळण्यास मदत होणार आहे. मात्र, आता यावर्षीच्या खरिपात शेतकऱ्यांना खतांच्या गोण्या नेमक्या किती रुपये दरात उपलब्ध होणार आहेत. हे देखील शेतकऱ्यांनी माहिती असणे आवश्यक आहे. सरकारकडून याबाबतची दर निश्चिती करण्यात आली असून, आपण शेतकऱ्यांना लागणाऱ्या सर्व खताच्या गोण्यांचे (Fertilizers Rate) आगामी खरीप हंगामासाठी नेमके किती रुपये दर ठरवण्यात आले आहेत. हे जाणून घेणार आहोत.

अशी आहे आकडेवारी (Fertilizers Rate In Kharif Season 2024)

केंद्र सरकारच्या माहितीनुसार, चालू खरीप हंगामासाठी फॉस्फोरिक खतांपैकी एक असलेल्या डीएपीच्या खताच्या गोणीसाठी 1350 रुपये प्रति गोणी इतका दर निश्चित करण्यात आला आहे. डीएपी या खतामध्ये प्रामुख्याने 18 टक्के नायट्रोजन आणि 46 टक्के फॉस्फरस आढळते. इतकेच नाही तर त्यात 39.5 टक्के विद्राव्य फॉस्फरस, 15.5 टक्के अमोनियम नायट्रेट देखील पोषक तत्वांसह उपलब्ध असतो. याशिवाय म्यूरेट ऑफ फॉस्फेट (एमओपी) खताच्या गोणीसाठी 1670 रुपये प्रति गोणी इतका दर निश्चित करण्यात आला आहे. याशिवाय एनपीके आधारित खताच्या गोण्यांसाठी 1,470 रुपये प्रति गोणी इतका दर निश्चित करण्यात आला आहे.

खताच्या गोण्यांचे रेट कार्ड?

  • डीएपी आधारित खताची गोणी – 1350 रुपये प्रति गोणी.
  • म्यूरेट ऑफ फॉस्फेट अर्थात एमओपी आधारित खताची गोणी – 1670 रुपये प्रति गोणी.
  • एनपीके आधारित खताची गोणी – 1,470 रुपये प्रति गोणी

युरिया निर्मितीत आत्मनिर्भरता

देशातील युरिया निर्मितीत आत्मनिर्भरता मिळवण्यासाठी सरकारच्या पातळीवरून प्रयत्न सुरु आहेत. मात्र असे असले तरी देशात रॉक फॉस्फेटच्या पूर्ततेसाठी मोठ्या प्रमाणात आयातीवर अवलंबून राहावे लागत आहे. रॉक फॉस्फेट हा डीएपी आधारित आणि एनपीके आधारित खतांच्या निर्मितीसाठीचा महत्वाचा कच्चा माल आहे. याशिवाय आपला देश मोठ्या प्रमाणात म्यूरेट ऑफ पोटॅश (एमओपी) साठी आयातीवर अवलंबून आहे. वार्षिक जवळपास 5 दशलक्ष टन फॉस्फेट रॉक, 2.5 दशलक्ष टन फॉस्फोरिक एसिड आणि 3 दशलक्ष टन डीएपीची आयात भारतात केली जाते. याशिवाय 25 टक्के युरिया आणि 15 टक्के एनपीके आधारित खतांच्या पूर्ततेसाठी आयातीचा आधार घेतला जातो.

error: Content is protected !!